Breaking News

पारधी समाजाच्या 111 कुटूंबियांना अ‍ॅड. संगिता चव्हाण कडून धान्य वाटप : भगवा सप्ताहा निमित्त शिवसेना महिला आघाडीचा आदर्श उपक्रम

बीड : शिवसैनिकांचे प्रेरणास्थान, अखंड हिंदुस्तानचे कवचकुंडल शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त बीड जिल्हा शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख अ‍ॅड. संगिता चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली ‘भगवा सप्ताह’ हा उपक्रम सामाजिक उपक्रमाने राबविण्यात येत आहे. यामध्ये शुक्रवारी दि. 22 जानेवारी रोजी पारधी समाजाच्या 111 कुटूंबियांना अ‍ॅड. संगिता चव्हाण यांच्याकडून धान्य वाटप करत भगावा सप्ताहा साजरा करण्यात आला. 

हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्या जयंती निमित्त पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उध्दवजी ंठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसेना मराठवाडा संपर्कनेते माजी खासदार चंद्रकांत खैरे, मराठावाडा समन्वयक विश्वनाथ जेरूरकर, संपर्कमंत्री संदिपान भुमरे यांच्या सुचनेवरून माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, संपर्कप्रमुख आनंद जाधव महिला संपर्क प्रमुख संपदा गडकरी, शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे, सचिन मुळूक, नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना महिला आघाडीकडून बीड जिल्ह्यात भगवा सप्ताह’ राबविण्यात येत आहे. गेल्या सहा दिवसांपासून विविध सामाजिक उपक्रम राबविले जात आहेत. 

यामध्ये शुक्रवार दि. 22 जानेवारी रोजी जिल्ह्यातील 111 पारधी सामाजच्या कुटूंबियांनांच्या वाडी, वस्तीवर जावून त्यांना धान्य वाटप करण्याचा आदर्श कार्यक्रम जिल्हाप्रमुख अ‍ॅड. संगिता चव्हाण यांनी राबविला आहे. यावेळी शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख अ‍ॅड. संगिता चव्हाण, उपजिल्हाप्रमुख फरजाना शेख, पाटोदा तालुका प्रमुख राहुल चौरे, महिला तालुका प्रमुख चंद्रकला वनवे, रेखा वाघमारे, सुगरण पवार, सतीश काळे, चिंतामण पवार, बंडू काळे, हरिभाऊ काळे, चंदू पवार, किरण पवार, रतन भोसले, अमर काळे, बंडू पवार, मुकेश पवार, कविता पवार, मेघा काळे, चिवा काळे, पोपट काळे यांच्यासह आदींची उपस्थिती होती. भुकेल्यांना अन्न धान्य वाटप करून जिल्हा शिवसेना महिला आघाडीचे सामाजिक भान जोपासले आहे.No comments