Breaking News

पिंपळवाडीत वीज चोरी...

 


आकडे बहाद्दरांवर महावितरणची कारवाई, वायरांची केली महावितरणने होळी 

आरेफ शेख । पिंपळवाडी  

वीजेची चोरी करुन सरार्स त्याचा वापर केला जात असल्याने त्याचा फटका महावितरणला बसत आहे. वीजेची चोरी आणि गळती रोखण्यासाठी महावितरण सरसावले असून बीड तालुक्यातील पिंपळवाडीत आकडे बहाद्दरांवर धडक कारवाई करत मंगळवारी (दि.८)  वायरची  महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी होळी केली.

बीड जिल्ह्यात वीज गळती व विजेची सर्रासपणे चोरी केली जात असल्याचे वारंवार उघड होत आहे. त्यामुळे महावितरणला त्याचा फटका बसत असून कंपनी तोट्यात चालली आहे. विजेची गळती व चोरी रोखण्यासाठी महावितरणने कंबर कसली असून मंगळवारी पिंपळवाडीत महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी थेट गावात जावून विद्युत तारेवर आकडे टाकून वीज चोरी करणाऱ्या आकडे बहाद्दरांवर कारवाईचा बडगा उगारला. यावेळी आकडे टाकण्यासाठी उपयोगात आणलेलं वायर जप्त करुन त्याची होळी करण्यात आली.  या कारवाईमुळे वीज चोरी करणाऱ्या आकडे बहाद्दरांमध्ये खळबळ उडाली आहे. 

वाढीव वीज बीलावरुन संताप

दरम्यान लॉक डाऊनच्या काळात वाजवी पेक्षा अधिक बील महावितरणने आपल्या ग्राहकांच्या माथी मारल्यानं संताप व्यक्त केल्या जात असून लॉक डाऊनच्या काळातील अनेकांचे काम- धंदे बंद असल्याने वीज बील कसे भरावे हाच प्रश्न पडलेला असताना वीज बील माफ करण्यात यावे, अशी मागणी होत आहे. मात्र वीज बील माफीवरुन निर्णय घेतला जात नसल्याने महावितरणच्या भोंगळ कारभाराविरुद्ध नागरिकांसह संताप व्यक्त केला जात आहे.
No comments