Breaking News

मराठ्यांच्या वैध आरक्षणाचा सरकारनं केला खून


मागणी नसताना EWS आरक्षण देऊन सरकारने मराठ्यांची फसवणूक केली”

पुणे : मराठ्यांच्या वैध आरक्षणाचा महाविकासआघआडी सरकारनं खून केला.” अशी टीका मराठा क्रांती मोर्चाच्या नेत्यांनी केली आहे. पुण्यातील पत्रकारपरिषदेद्वारे मराठा क्रांती मोर्चाकडून राज्य सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडण्यात आलं. “मागणी नसताना EWS आरक्षण देऊन सरकारने मराठ्याची फसवणूक केली.” असा आरोप मराठा क्रांती मोर्चाच्या नेत्यांनी केला आहे.

मराठा समाजाला EWS चा लाभ देण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे. आरक्षणाला स्थगिती दिल्यामुळे नाराज झालेल्या मराठा समाजासाठी महाविकास आघाडी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार मराठा समाजाला आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी देण्यात येणाऱ्या आरक्षणाचा (EWS) लाभ देण्यात येणार आहे. मात्र राज्य सरकारच्या निर्णयामुळे नाराज झालेल्या मराठा क्रांती मोर्चाकडून आता जोरदार टीका केली जात आहे.

“EWS आरक्षण द्या अशी सार्वजनिक मराठा समजाची कधीही मागणी नव्हती. EWS आरक्षण देऊन जे महत्वपूर्ण आरक्षण आहे, त्याचा खून करण्याचं काम या महाविकासआघाडी सरकारने केलेलं आहे. ही मराठ्यांची खूप मोठी फसवणूक या महाविकासआघाडी सरकारने केलेली आहे.” असं मराठा क्रांती मोर्चाकडून सांगण्यात आलं आहे.
No comments