Breaking News

बीड नगरपरिषद संभाजी ब्रिगेड कर्मचारी संघटनेचा विस्तार


बीड : शासकीय विश्रामगृहावर आज दिनांक 13 डिसेंबर 2020 रोजी नगर परिषद कर्मचार्‍यांच्या निवडी करण्यात आल्या;  यावेळी संभाजी ब्रिगेड नगर परिषद कर्मचारी जिल्हा उपाध्यक्ष म्हणून सुनील काळकुटे तसेच जिल्हा कार्याध्यक्ष म्हणून अमोल शिंदे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

सदरील निवडीनंतर श्री.सुनिल काळकुटे व श्री  अमोल शिंदे यांनी सर्व कर्मचारी यांचे सामाजिक त्याचबरोबर प्रशासकीय प्रश्न सोडवण्याचे  अभिवचन व्यक्त करून या संघटनेत प्रामाणिकपणे काम करण्याची   भावना व्यक्त केली.यावेळी संभाजी ब्रिगेड शिक्षक व कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत बागलाने सर, जिल्हा उपाध्यक्ष मनोज कवडे सर, जिल्हा कार्याध्यक्ष गणेश शिंदे सर,  नगरपरिषद जिल्हाध्यक्ष अमोल बागलाने,वडवणी तालुका अध्यक्ष सचिन कदम सर वडवणी तालुका सचिव दिनेश माने सर वडवणी तालुका संघटक लिंगसकर सर,यांची याठिकाणी उपस्थिती होती.No comments