Breaking News

प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीनं आमदार सतीश चव्हाण यांचा सत्कार


बीड : 
औरंगाबाद येथे नवनिर्वाचित मराठवाडा पदवीधर आमदार सतीश  चव्हाण यांचा सत्कार महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ जिल्हा बीड व आखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने आज सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हाध्यक्ष भगवान पवार , जिल्हाध्यक्ष सूनिल कुर्लेकर , शिक्षक संघाचे जिल्हा प्रशिध्दीप्रमुख रत्नाकर वाघमारे , जिल्हा उपाध्यक्ष जिवन बागलाने उपस्थित होते .आ. सतीश ( भाऊ) चव्हाण यांना प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष भगवान पवार  व सूनिल कुर्लेकर.यांनी बीड जिल्हातील  शिक्षकांचे प्रलंबित  प्रश्न वरिष्ठ व निवडश्रेणी विनाअट देण्याचा शासन निर्णय असताना जिल्हा परिषदेकडून अनेक त्रुटी काढून प्रस्ताव परत केले जातात. वैद्यकिय परिपुर्ती देयकांना विलंब लागतो . बजेटच्या नावाखाली वैदयकिय परिपूर्ती आदेश मिळूनही रक्कम मिळत नाही.

शिक्षकांचे पगार वेळेवर होण्यासाठी जिल्हापरिषद शिक्षण विभागामार्फत  cmp प्रणालीप्रमाणे पगार करावेत . विस्तार अधिकारी , केंद्रप्रमुख , मुख्याध्यापक यांची पदोन्नती करावी . शिक्षकांच्या बदल्या ऑनलाईन कराव्यात बदल्यांची टक्केवारी ठेवावी खोखो पध्दत बंद करावी बदल्यांचा शासननिर्णय सर्वसमावेशक काढावा.इ. महत्वाचे पश्न मांडले  आ. चव्हाण  यांनी राज्यस्तरावरिल प्रश्नांचा पाठपुरावा शासनाकडे करण्याचे व जिल्हास्तरिय प्रश्नांसाठी बीडचे मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकारी यांच्याकडे करण्याचे अभिवचन दिले.

No comments