Breaking News

शेळीपालन व कुक्कुटपालन व्यावसायिकांचे संघटन तयार करणार - दत्ता जाधव

 


गेवराई :  बीड जिल्ह्यात शेळीपालन व कुक्कुटपालन व्यवसायातील अडी-अडचणी दूर करण्यासाठी व यशस्वी व्यवसाय उभा करण्यासाठी या व्यावसायिकांचे संघटन तयार करणार असल्याचे माहिती माँसाहेब गोट फार्म चे अध्यक्ष दत्ता जाधव यांनी दिली आहे.

    

शेतीला जोडव्यवसाय म्हणून शेळीपालन व कुक्कुटपालन या व्यवसायाकडे पाहितले जाते.परंतु आता या व्यवसायाकडे प्रमुख व्यवसाय म्हणून पाहितल्यास युवकाना यामध्ये मोठी संधी आहे.अनेक बेरोजगार युवकांना या व्यवसायातून रोजगार उपलब्ध होऊ शकतो.यासाठी शासनाने या व्यावसायिकांना मदत करणे आवश्यक आहे.या व्यवसायात अनेक अडी-अडचणी आहेत त्यामध्ये प्रामुख्याने बीड जिल्ह्यात पाळीव प्राण्यांचा विमा पॉलिसी बंद असणे,वेळेवर शासकीय पशुवैद्यकीय दवाखान्यात उपचार न मिळणे,बँकेत कर्ज प्रकारने मंजूर न होणे याबरोबरच अनेक प्रश्न या व्यवसायात आहेत.हे प्रश्न सोडवण्यासाठी संघटन असणे आवश्यक आहे, त्यामुळे बीड जिल्ह्यात या व्यवसायीकांचे संघटन उभे करणार असल्याची माहिती धनंजय गुंदेकर यांनी दिली आहे.No comments