Breaking News

सुरेश चाटे यांची संभाजीनगर पोलीस ठाण्याच्या निरीक्षकपदी नियुक्ती पो.नि.बी.एन.पवार यांची अंबाजोगाई शहरला बदली

पोनि सुरेश चाटे

परळी : 
बीड जिल्हा पोलीस दलात  बुधवार दिनांक 16 डिसेंबर 2020 रोजी दोन फेरबदल करण्यात आले असून नियंत्रण कक्षातील पोलीस निरीक्षक सुरेश चाटे यांची परळी येथील संभाजीनगर पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
पोनि बी एन पवार

तर अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक पदी परळी येथील संभाजीनगर पोलीस ठाण्याचे बी एन पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक सिद्धार्थ गाडे यांच्या बदलीनंतर हे  पद रिक्त होते. सहाय्यक निरीक्षक प्रभारी यांच्याकडे पदभार सोपवला होता. अखेर अंबाजोगाई शहर ठाण्यात परळीच्या संभाजीनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक बाळासाहेब पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे तर नव्याने बदलून आलेले पोलीस निरीक्षक सुरेश चाटे हे परळी संभाजीनगर पोलीस ठाण्याच्या निरीक्षक पदी नेमण्यात आले आहेत. बीड जिल्हा पोलीस अधीक्षक ए. राजा यांनी बुधवारी सदरील आदेश जारी केले आहेत.


No comments