Breaking News

रक्तदान शिबीराच्या माध्यमातुन मुंडे साहेबांना खरी आदरांजली ठरेल : खा. डॉ. प्रितम मुंडे


लोकनेते गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानचा ४४४ रक्तदानाचा रेकॉर्ड ब्रेक महायज्ञ

जगदीश गोरे । वडवणी

स्व.मुंडे साहेबांनी केंद्रीय मंत्र्यापर्यंत बीड जिल्ह्यातल्या जनतेच्या जिवावर मजल मारली होती. मी मुंडे साहेबांना वडील म्हणुन पाहीले मात्र अनेकांनी त्यांच्यासोबत काम केलं आहे.मी त्यांच्या रक्ताची असले तरी संपुर्ण बीड नव्हे तर महाराष्ट्रात मुंडे साहेबांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबीरे होत आहेत.त्यामुळे जयंतीदिनी रक्तदान करणारे स्व.गोपीनाथ मुंडे साहेबांच्या रक्ताचे आहात त्यामुळे रक्तदान शिबीराच्या माध्यमातुन मुंडे साहेबांना खरी आदरांजली ठरेल असे मत बीड जिल्ह्याच्या खासदार डॉ.प्रितम मुंडे यांनी वडवणीतील लोकनेते स्व.गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने आयोजीत महारक्तदान शिबीरात व्यक्त केले.

यावेळी माजी आमदार केशवराव आंधळे,भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के,राजाभाऊ मुंडे,सभापती दिनकरराव आंधळे,प्रा.सोमनाथ बडे,शिवसेनेचे विनायक मुळे,बन्सीधर मुंडे,माजी जि.प.सदस्य नवनाथ म्हेत्रे,गुलाब राऊत,महादेव जमाले,मच्छिंद्र झाटे,उपसभापती ॲड.प्रदीप शेळके,अंकुश वारे,कैलास भुजबळ,भाजप तालुका अध्यक्ष पोपट शेंडगे,विश्वनाथ झाटे,महादेव रेडे,नागेश डिगे,यांच्यासह असंख्य रक्तदाते व कार्यकर्ते उपस्थित होते.पुढे बोलतांना खासदार मुंडे म्हणाल्या की,मुंडे साहेबांच्या जयंतीच्या निमित्त होणारा प्रत्येक वर्षीचा पहीला रक्तदान कार्यक्रम  युवा नेते संजय आंधळे यांचा असतो.ही तारीख मी कायम राखीव ठेवलेली आहे.या कार्यक्रमा नंतरच मी पुढील कार्यक्रम ठरवत असते.आपल्या नेत्या पंकजा मुंडे यांनी जयंतीनिमित्त रक्तदान करण्याचे आव्हान केल्यामुळे राज्यातील रक्तपेढीमध्ये रक्तसाठा वाढणार आहे.आयोजक संजय आंधळे,अमोल आंधळे यांच्यासह प्रतिष्ठानच्या सर्व शिलेदारांचे खासदार प्रितम मुंडे यांनी तोंडभरून कौतुक केले.याप्रसंगी माजी आमदार केशवराव आंधळे,प्रा.सोमनाथ बडे,जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के,राजाभाऊ मुंडे यांचीही भाषणं झाली.प्रास्ताविक संजय आंधळे यांनी केले तर आभार रणजीत धस यांनी मानले.रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी संजय आंधळे,अमोल आंधळे,रणजीत धस,मयुर आंधळे,अशोक आंधळे, आबासाहेब आंधळे,उद्धव बडे,गोरख मुंडे,श्रीमंत मुंडे,अंगद मुंडे,कैलास दुधाने,युवराज शिंदे,ॲड.सचिन आवचर,सुशील बडे,भागवत आंधळे,बाळु आडे,भास्कर मुंडे,महादेव सावंत,बिभीषण आंधळे,धंद्यात मुंडे,शेख मोहसीन,बिभीषण लोंढे,शुभम जायभाय,रोहीत उजगरे,बाबा उजगरे,अशोक कुलकर्णी,रतन पाटोळे,यांनी मोठे परिश्रम घेतले.

रक्तपेढीला अंदाज आला नाही

वडवणीत आज लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.यावेळी बीड जिल्हा रुग्णालयाच्या रक्तपेढीच्या डॉक्टर व कर्मचारी यांना या शिबिरात नेमके किती रक्तदाते येतील याचा अंदाज आला नाही. ४४४ रक्तदात्यांनी रक्तदान केल्यानंतर रक्तदान करण्यासाठी लागणारे साहित्य अपुरे पडले.स्वतंत्र गाडी पाठवुन बीड जिल्हा रुग्णालयातुन साहीत्य मागवुन पुन्हा रक्तदान सुरू केले.

हयात असेपर्यंत रक्तदान शिबिर सुरू ठेवणार

लोकनेते मुंडे साहेब हयात असताना वाढदिवसानिमित्त सुरू झालेला रक्तदानाचा महायज्ञ स्व.मुंडे साहेब नसतानाही सुरू असुन या शिबीराला नऊ वर्षे पुर्ण होत आहेत.रक्तदान शिबीराची दशकपुर्ती साजरी करतांना एक संकल्प करत आहे की,मी हयात असेपर्यंत स्व.मुंडे साहेबांच्या जयंतीनिमित्त रक्तदानाचा महायज्ञ अविरत सुरू राहील.जेणेकरून मुंडे साहेबांना हीच खरी श्रद्धांजली ठरेल.

संजय आंधळे,अध्यक्ष लोकनेते गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठाण

४४४ रक्तदात्यांनी केले रेकॉर्डब्रक रक्तदान

लोकनेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त वडवणी शहरात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात ४४४ रक्तदात्यांनी रक्तदान करून जिल्ह्यात एक नवा उच्चांक निर्माण केला आहे. त्यामुळे लोकनेते स्व.गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने संजय आंधळे व अमोल आंधळे यांनी रक्तदात्यांचे आभार व्यक्त केले.


No comments