Breaking News

अभिषेक दिंडेला शौर्य पुरस्कार द्या : सतिष झगडे यांची तहसीलदार यांच्याकडे मागणी


 के. के. निकाळजे । आष्टी 

बिबट्याच्या तावडीत आई सापडल्या नंतर जीवाची परवा न करता आईचे प्राण वाचविणाऱ्या तिच्या शूर पुत्रास अभिषेक दिंडे याला शौर्य पुरस्कार देण्यात येवून त्याचा सन्मान करावा अशी, मागणी माजी जिल्हा परिषद सदस्य सतिष झगडे यांनी तहसिलदार यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली. 

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की आष्टी तालुक्यात नरभक्षक बिबट्याने तिन लोकांचे बळी घेतले असुन मगरूळ गावातिल लिलावती दिंडे या महिलेवर शेतात अचानक बिबट्याने हल्ला केला. त्यावेळेस जवळ तिचा मुलगा होता. आपल्या आईवर बिबट्याने हल्ला केल्याचे पाहिले.  आईचा हात पकडलेला असताना जिवाची पर्वा न करता बिबट्याचे तोंड हाताने पकडुन बिबट्याला बाजुला लोटले व आईचा प्राण  वाचवला अभिषेक याचे वय 15 असुन त्याचा पराक्रम पाहता त्याची शौर्य पुरस्काराठी निवड होउ शकते. ते शेतकरी कुटुंब असल्याने त्यांना याबाबतची काहीच माहीती नसावी. तरी आपण वनखात्याकडुन पंचनामा व माहीती घेउन जिल्हाधिकारी बीड यांचे मार्फत भारत सरकार दिल्ली यांना पाठवावा असे तहसीलदार आष्टी यांना दिलेल्या निवेदनात माजी जि. प सदस्य सतिष (मामा) झगडे यांनी म्हटले आहे.


No comments