Breaking News

ओबीसी बारा बलुतेदार, आठरा आलुतेदार, भटके विमुक्त, एसबीसी समाज बांधवांनी ओबीसी आरक्षण बचाव मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे- प्रकाश कानगावकर


उठ ओबीसी जागा हो, परिवर्तनाचा धागा हो...

बीड :  भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेच्या माध्यमातून ओबीसी समाजाला दिलेले हक्काचे आरक्षण फक्त ओबीसी समाजाचेच आहे. इतर समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आमचा पाठींबाच आहे. परंतु ओबीसी आरक्षणाला धक्का लावल्यास महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ शकतो येत्या मंगळवार दि. 8 डिसेंबर 2020 रोजी बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर ओबीसी आरक्षण बचाव मोर्चा भव्य स्वरुपात निघणार आहे. या मोर्चात ओबीसी बारा बलुतेदार, आठरा आलुतेदार, भटक्या विमुक्त व एसबीसी समाज बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन ओबीसी बारा बलुतेदार, आठरा आलुतेदार  संघटनेचे जिल्हा तथा भावसार समाजाचे राज्य उपाध्यक्ष प्रकाशराव कानगावकर यांनी केली आहे. 

प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, महाराष्ट्रात ओबीसींचा मंडल आयोग 1994 साली लागू होवूनही पंचवीस वर्षानंतरही ओबीसीच्या समस्या कायमच नाही तर त्यात दिवसेंदिवस वाढ होत आहे. ओबीसी विद्यार्थ्यांची तीन हजार कोटीची थकीत शिष्यवृत्ती, ओबीसी विद्यार्थ्यांची वसतीगृहे, स्वाधार योजना, महाज्योतीला हजारो कोटींचा निधी हे विषय ऐरणीवर असतांना आता काही लोकांनी ओबीसीचे आरक्षण धोक्यात आणण्याचे कट कारस्थान सुरु केले आहे. त्यासाठी महाराष्ट्रात ओबीसी जनजागृती करण्याची खरी गरज आहे. ओबीसी आरक्षणाला धक्का लावू नये, ओबीसीची जातनिहाय जनगणना तात्काळ करण्यात यावी, 100 टक्के मंडल आयोग लागू करावा, जात निहाय जनगनना करण्यात यावी तसेच ओबीसींच्या इतर मागण्या तात्काळ शासनाने निकाली काढण्यासाठी आज होत असलेल्या ओबीसी आरक्षण बचाव मोर्चाला ओबीसी बारा बलुतेदार, आठरा आलुतेदार, भटके विमुक्त, एसबीसी समाज बांधवांनी, भगिनींनी, युवक, युवती, विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन ओबीसी बारा बलुतेदार, आठरा आलुतेदार संघटनेचे जिल्हा तथा भावसार समाजाचे राज्य उपाध्यक्ष प्रकाशराव कानगावकर यांनी केली आहे. 


No comments