Breaking News

'राज्य सरकारमध्ये विरोधीपक्षाच्या प्रश्नांना सामोरे जायची हिंमत दिसत नाही; हे सरकार पळपुटे' - आ. मेटे


कोरोनाच्या नावाखाली अधिवेशनाचा कालावधी अत्यंत कमी केला गेला - आ विनायक मेटे

मुंबई :  विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक सभापती रामराजे निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली काल दुपारी ४ वाजता पार पडली.  सदर बैठकी मध्ये सरकार ने १४ आणि १५ डिसेंबर   2020 रोजी दोनच दिवसांचे अधिवेशन घ्यावे असा प्रस्ताव  मांडला. मात्र विरोधीपक्ष नेते प्रवीणजी दरेकर व समितीचे सदस्य आ विनायक मेटे यांनी दोन आठवड्याचे हे अधिवेशन घ्यावे अशा पद्धतीचा प्रस्ताव मांडून, मागणी केली. सदरील दोन आठवड्यांमध्ये, महाराष्ट्र राज्यात जे ज्वलंत व महत्वाचे विषय आहेत ते घ्यावे व सरकारने आपली भूमिका त्यामध्ये मांडावी, अशी भूमिका विरोधीपक्षनेते दरेकर व आ विनायक मेटे यांनी घेतली.

     

त्या विषय मध्ये प्रामुख्याने  मराठा समाजाच्या भवितव्याचा दृष्टीने महत्त्वाचे असणारा मराठा आरक्षणाचा प्रश्न, नोकर भरती, शैक्षणिक प्रवेश, नोकरभरती प्रक्रिया झालेले सर्व उमेदवारांना नियुक्ती मिळने, EWS  आरक्षण मिळने, व इतर सोई सुविधा मिळने महत्वाचे असून त्या वर एक दिवस चर्चा करावी, अशी भूमिका आ विनायक मेटे यांनी मांडली. त्याला विधान परिषद विरोधीपक्ष नेते प्रविनजी दरेकर व अन्य सदस्यांनी  साथ दिली. ह्या सोबतच शेतकऱ्यांचे प्रश्न, अतिवृष्टी मुळे झालेले नुकसान, कापूस खरेदी , दुध दर वाढीचा प्रश्न, याच बरोबर विजेचे वाढीव बिल आणि कोरोना अश्या महत्त्वच्या विषयवार चर्चा घ्यावी हे  सांगितले. परंतु सरकार मध्ये मात्र ह्या सर्व प्रश्नाला सामोरे जायची हिमत दिसत नाही. म्हणून त्यांनी कारोनाच्या नावाखाली अधिवेशन गुंडाळण्याचा कार्यक्रम कालच्या बैठकी मध्ये केला गेला. 

     

या राज्यामध्ये हॉटेल उघडलेले आहेत, बार उघडले आहेत, दारूचे दुकानं उघडली आहेत, शाळा आता उघडायला परवानगी देलेले आहे. मंदिर, मस्जिद सगळे देवस्थान उघडायला परवानगी दिलेली आहे, बस चालू आहे, वाहतूक चालू आहे, ट्रेन चालू आहेत, हे सर्व चालू आहेत त्याचा मध्ये शेकडो हजारो लोक वाहतूक करतात,  मार्केट सगळे खुले केलेलं आहेत, मॉल उघडलेली आहेत तेव्हा इथे मात्र कुठे त्यांना कोरोनाची अडचण वाटली नाही. पण अधिवेशन मध्ये मात्र विधान सभेचे २८८ आणि विधानपरिषदेचे ७८ आमदारांन मध्ये मात्र त्यांना अडचण वाटते आहे. याचा सरळ आणि स्पष्ट अर्थ असा आहे की, या सरकार मध्ये महाराष्ट्रच्या समोरील प्रश्नांना सामोरे जायची हिंम्मत नाही. पळपूटे पणाचे काम हे सरकार करत आहे. अशी टीका आ विनायक मेटे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केली.


No comments