Breaking News

शेतकरी विरोधी कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी आज वंचितचे धरणे आंदोलन


जिल्हा प्रवक्ते धम्मानंद साळवे यांची पत्रकार परिषदेत माहिती  

बाळासाहेब आडागळे । माजलगाव 

आज दिल्ली इथे देशातला शेतकरी न भुतो न भविष्याची असे आंदोलन करीत आहे. केंद्र सरकारने लॉक डाऊनच्या काळात शेती संबंधी तीन नवीन कायदे चर्चा न करता संसदेत संख्या बळाच्या आधारावर मंजुर करुन घेतले.या नवीन विधेयकामुळे भारतीय शेतकरी अक्षरश : नागवला जाणार असून तो देशोधडीला लागणार आहे,त्यामुळे वंचित आघाडीच्या वतिने दिल्लीतील शेतकरी आंदोलन व रेल्वेच्या खाजगीकरणा विरोधात आज बिड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती वंचित आघाडीचे जिल्हा प्रवक्ते धम्मानंद साळवे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

जागतिकीकरण आणि त्यामागुन अपरिहार्यपणे येणाऱ्या खाजगीकरणातून शेतकऱ्यांचा शेतमाल कवडी मोलाने विकत घेण्याची मुभा आणि त्याच बरोबर शेतकऱ्यांच्या जमिनी गिळंकृत करण्याचा राजमार्ग या नवीन विधेयकात आहे . दिल्लीत शेतकरी आंदोलन सुरू आहे त्याला पाठिंबा म्हणुन बीड जिल्हाच्या जिल्हा कार्यालयावर उद्या दिनांक १७ डिसेंबर २०२० रोजी सकाळी १०:०० ते ४:०० या वेळेस प्रचंड मोठी असे धरणे आंदोलन करण्यात येणार आहे .धरणे आंदोलनात पक्षाच्या वतिने खालील मागण्याचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात येणार आहे . महाराष्ट्रातील आघाडी सरकार मधिल सर्व पक्षांनी शेतकरी आंदोलनाला पाठींबा दिला आहे. महाआघाडीची ही भुमिका प्रामाणिक असेल तर महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्रातील शेतकरी विरोधी कृषि उत्पन्न बाजार समितीच्या कायद्यात दुरूस्ती करणारा अध्यादेश ताबडतोब काढावा व विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात शेतकऱ्यांच्या शेतमालाला किमान आधारभुत किंमत ( हमी भाव ) मिळण्यासाठी कायद्यात स्पष्ट तरतूद करावी आणि त्याची कठोर अंमलबजावणी करावी.  

शेतमालाची वाहतुक करण्यासाठी मुख्यतः भारतीय रेल्वेचा वापर होतो,या भारतीय रेल्वेचे खाजगीकरण करण्याचा केंद्र सरकारचा इरादा आहे. खाजगीकरणामुळे शेतीमालाची वाहतुक प्रचंड खर्चिक होईल व सर्वसामान्य ग्राहकांवर वाढीव भावाचे ओझे लादले जाईल.रेल्वेच्या खाजगीकरनाचा निर्णय केंद्र सरकारने ताबडतोब रद्द करावा. दिल्लीत आंदोलन करीत असलेल्या आमच्या शेतकरी बांधवांच्या आंदोलनाने भारतीय रेल्वेच्या खाजगीकरणाला व मोदी सरकारच्या सर्व सार्वजनिक सेवांच्या खाजगीकरणाला विरोध करण्याची भुमिका घ्यावी असे आवाहन वंचीत बहूजन आघाडी करत आहे व शेतकरी आंदोलनाला सक्रिय पाठिंबा देत आहे,या पत्रकार परिषदेला जिल्हा सहसचिव आंकुशराव जाधव,सम्यक आंदोलनचे प्रशांत बोराडे, संदिप फंदे,बाळासाहेब गायसमुद्रे,आशोक पौळ,सुशील मगरे व प्रकाश पौळ यांची उपस्थिती होती.
No comments