Breaking News

साळेगाव येथे महसूल विभागाच्या वतीने शेतकऱ्यांना ई-पीक पहाणी ॲप बाबत मार्गदर्शन


गौतम बचुटे । केज 

शेतकऱ्यांना त्यांच्या शेतातील पिकांच्या नोंदी संदर्भात आता तलाठी किंवा महसूल अधिकाऱ्याकडे न जाता आपल्या जमिनीत लागवड केलेल्या पिकांची नोंद ही मोबाईलद्वारे करता येणार असून सरकारने त्यासाठी  ई-पीक पहाणी ॲप विकसित केले आहे. त्याची माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी केज तहसीलच्या वतीने केज तालुक्यातील साळेगाव येथे त्या बाबत प्रात्यक्षिक व मार्गदर्शन करण्यासाठी एक कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.

या बाबतची माहिती अशी की, शेतकऱ्यांना पीक विमा, शासकीय अनुदान, सवलती व पीक कर्ज या बाबत पूर्वी तलाठी कार्यालयातून पीक पेरा अहवाल घ्यावा लागत असे. तसेच ७/१२ उताऱ्यावर त्याची नोंद घ्यावी लागत असे. तसेच त्या नंतर पुढे पीक पेरणीचे स्वयं घोषणा पत्र द्यावे असे. यात सुसूत्रता आणि  वास्तववादी, अचूक व सत्यनोंदी करण्यासाठी आणि शेतकऱ्यांचा वेळ वाचवा म्हणून महाराष्ट्र शासनाने  ई-पीक पहाणी ॲप नावाचे विकसित केले आहे. साळेगाव येथे त्याची माहिती देण्यासाठी तहसीलदार मेंढके यांच्या आदेशा नुसार सरपंच कैलास जाधव यांच्या उपस्थितीत तलाठी इनामदार आणि पटाईत यांनी कार्यशाळा आयोजित करून त्या बाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन व प्रात्यक्षिक दाखविले. या कार्यशाळेला ग्रामपंचायत सदस्य भागवत मुळे, आश्रूबा गित्ते, दत्तू लांडगे, विष्णू इंगळे, सुधाकर इंगळे, बलभीम गिते, लांडगे आणि शेतकरी उपस्थित होते.


No comments