Breaking News

मुळूकवाडी वंजारवाडीत भाजप-सेना फुटली उपसरपंचासह कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश

गेवराई :  तालुक्यातील मौजे मुळूकवाडी वंजारवाडीत भाजप-सेनेला भगदाड पडले असून उपसरपंचासह आनेक भाजप आणि सेना कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित आणि माजी जि. प. अध्यक्ष विजयसिंह पंडित यांच्या नेतृत्वात विश्वास ठेवून राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केला आहे. यापुढील काळात आपण आमचे नेते अमरसिंह पंडित आणि विजयसिंह पंडित यांचे हात बळकट करुन मुळूकवाडी वंजारवाडी परिसर राष्ट्रवादीमय करु असा विश्वास उपसरपंच महादेव पवार यांनी व्यक्त केला. यावेळी विजयसिंह पंडित यांनी त्यांचे राष्ट्रवादीत स्वागत करुन त्यांना शुभेच्छा दिल्या.
मंगळवार दि. २२  डिसेंबर रोजी मुळूकवाडी येथील भाजपचे विद्यमान
उपसरपंच महादेव पवार, शिवसेनेचे सक्रिय कार्यकर्ते केरुबा पवार, बाळू पवार
आणि वंजारवाडी येथील शिवसेनेचे सक्रिय कार्यकर्ते सुनील तारगे यांनी आपल्या असंख्य कार्यकार्यत्यांसह माजी जि. प. अध्यक्ष विजयसिंह पंडित यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी विजयसिंह पंडित यांनी त्यांचे राष्ट्रवादीत स्वागत करुन त्यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी अविनाश वदक, मोतीराम कोकाटे, बबन कोकाटे, शंकर वाघ, सोमेश्वर कोकाटे, संजय साबळे, चंद्रभान कोकाटे, गणेश साबळे, धोंडीराम पौळ, सरपंच रवींद्र चोरमले, बाबुराव पवार, दौलत दाभाडे, विष्णू पवार, बन्सी पवार, सूर्यकांत पवार, भीमराव गंगाधर यांच्या सह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.No comments