Breaking News

खा. शरद पवार यांच्या ८०व्या वाढदिवसानिमित्त मतदारसंघात विविध कार्यक्रमाचे आयोजन -आ. बाळासाहेब आजबे


के. के. निकाळजे । आष्टी  

माजी केंद्रीय कृषिमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जाणता राजा खा. शरद चंद्र पवार यांच्या 80 व्या वाढदिवसानिमित्त आष्टी पाटोदा शिरूर मतदार संघात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून याच दिवशी सकाळी 11 ते 2 या वेळेत व्हिडिओ कॉन्फरन्सिंग प्रोजेक्टर द्वारे राज्यस्तरीय वाढदिवसानिमित्त विशेष कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण आष्टी पाटोदा शिरूर या ठिकाणी पहावयास मिळणार आहे तरी मतदारसंघातील कार्यकर्ते व नागरिकांनी या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आमदार बाळासाहेब आजबे यांनी केले आहे. 

      

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार साहेब यांच्या 80 व्या वाढदिवसानिमित्त आष्टी, पाटोदा ,शिरूर याठिकाणी ग्रामीण रुग्णालयातील व कोविड सेंटर मधील रुग्णांना सकाळी 9 ते 10 या वेळेत फळे व अत्यावश्यक साहित्याचे वाटप करण्यात येणार आहेत त्यानंतर 11 ते 2 या वेळेत आष्टी येथील कै. बी .डी  हंबर्डे महाविद्यालय, पाटोदा येथील संत रोहिदासमंगल कार्यालय व शिरूर 


या ठिकाणी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग  प्रोजेक्टर द्वारे मुख्य कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण दाखविण्यात येणार असून या कार्यक्रमांमध्ये राष्ट्रीय व राज्यस्तरीय मुख्य नेत्यांचे वेगवेगळ्या विषयावर मार्गदर्शन व खासदार शरदचंद्र पवार साहेब यांचे अनमोल असे लाईव्ह मार्गदर्शन याठिकाणी दाखवण्यात येणार आहे, यासाठी मतदारसंघातील शेतकरी ,ज्येष्ठ नागरिक, युवक व सर्व क्षेत्रातील मान्यवर मंडळींनी उपस्थित राहून हा आगळावेगळा थेट लाईव्ह सोहळा अनुभवावा असे आवाहन आमदार बाळासाहेब आजबे काका यांनी केले आहे, यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष अण्णासाहेब चौधरी ,माजी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉक्टर शिवाजी राऊत ,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते हरिभाऊ दहातोंडे उपस्थित होते.


No comments