Breaking News

उद्या वडवणी तालुक्यातील ३५ ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाची आरक्षण सोडत


तहसील कार्यालयाच्या मिटींग हॉलमध्ये होणार सोडत 

जगदीश गोरे । वडवणी 

वडवणी तालुक्यातील ३५ ग्रामपंचायतींच्या सन २०२० ते २०२५ या कालावधीसाठी सरपंचपदासाठीची आरक्षण सोडत उद्या सोमवार दि.७ रोजी तहसील कार्यालय वडवणी येथील मिटिंग हॉलमध्ये दुपारी ठीक ३ वाजता होणार असून याची वडवणी तालुक्यातील सर्व जनता, पदाधिकारी, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांनी नोंद घ्यावी असे आवाहन तहसीलदार श्रीकिशन सांगळे यांनी केले आहे. 

                

याबाबत अधिक माहिती अशी की, तहसीलदार वडवणी यांनी दिलेल्या जाहीर प्रसिध्दीपत्रकात नमूद करण्यात आले आहे की, वडवणी तालुक्यातील सर्व जनतेस तसेच सर्व पदाधिकारी, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांना याव्दारे सुचित करण्यात येते की, वडवणी तालुक्यातील आगामी एकूण ३५ ग्रामपंचायत निवडणुकीसाठीचे सन २०२० ते २०२५ या कालावधीसाठी सरपंचपदाचे आरक्षण सोडतीचा कार्यक्रम दिनांक ७ डिसेंबर २०२० सोमवार रोजी तहसील कार्यालय वडवणी येथील मिटींग हॉलमध्ये दुपारी ठीक ३ वाजता होणार असून यामध्ये वडवणी तालुक्यातील एकूण ग्रामपंचायत संख्या- ३५, अनुसूचित जातीसाठी आरक्षित सरपंचपद- ६, अनुसूचित जमातीसाठी आरक्षित सरपंचपद- ०, नागरी मागास प्रवर्गासाठी आरक्षित सरपंचपद- ९, तर खुला प्रवर्गासाठी आरक्षित सरपंचपद- २० अशाप्रकारे प्रवर्गनिहाय सरपंचपदाच्या आरक्षणाची सोडत संपन्न होणार असून याची सर्वांनी नोंद घ्यावी असे आवाहन तहसीलदार श्रीकिशन सांगळे यांनी केले आहे.


No comments