Breaking News

केज तालुक्यातील डोका (हादगाव) खून प्रकरण : आरोपीच्या कोठडीत व वाढ


गौतम बचुटे । केज

केज तालुक्यातील डोका (हादगाव) येथे दि.२४ नोव्हेंबर रोजी आत्याच्या वर्ष श्राध्दासाठी सांगली येथून माहेरी आलेल्या एका ४२ वर्षीय महिलेचा तीक्ष्ण हत्याराने गळा चिरून व दगडाने ठेचून खून करण्यात आला होता. 

आरोपी दयानंद भिमराव गायकवाडला ७ दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. त्यास दि.३ डिसेंबर रोजी पुन्हा न्यायालयासमोर हजर केले असता पुढील तासासाठी त्याला दि.७ डिसेंबर पर्यंत ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी भास्कर सावंत हे करीत आहेत.


No comments