Breaking News

पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली विकासासाठी गावकरी एकवटले


परळी मतदारसंघातील रेवली, वंजारवाडी, मूर्ती या तीन ग्रामपंचायती बिनविरोध

परळी वै :   राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा पालकमंञी ना.धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली विकास करण्यासाठी परळी मतदारसंघातील रेवली, वंजारवाडी, मुर्ती या ग्रामपंचायत बिनविरोध काढण्यात आल्या आहेत. या तिन्ही ग्रामपंचायत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या ताब्यात आल्या आहेत.

परळी मतदारसंघातील परळी व अंबाजोगाई तालुक्यातील प्रत्येकी 7 ग्राम पंचायतीच्या निवडणूका होत आहे. गावा गावात होणारे राजकारण व त्यावरील खर्च टाळून एकजुटीने गावच्या विकासाचा ध्यास घेऊन ग्रामपंचायत बिनविरोध काढाव्यात या कडे सर्वांचा कल आहे. 

त्या दृष्टीने पालकमंञी ना.धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली अधिका अधिक ग्रामपंचायत बिनविरोध व्हाव्यात यासाठी जि.प.गटनेते श्री.अजय मुंडे व न.प.गटनेते वाल्मिक आण्णा कराड यांच्या पुढाकाराने प्रयत्न केला जात होता. यांच्या प्रयत्नांना प्रतिसाद देत परळी तालुक्यातील रेवली, वंजारवाडी ही दोन गावे व अंबाजोगाई तालुक्यातील मुर्ती हे एक गाव अशा एकुण या तीन गावांनी आपल्या ग्रामपंचायत बिनविरोध काढल्या आहेत. 

यात रेवली गावातील श्रीमती रेखाबाई मनोहर केदार, श्री.वैजनाथ माणिकराव कांदे, श्रीमती आशा किसन कांदे, श्री.आबासाहेब शत्रुघ्न मोटे, श्रीमती शंकुतला रतन कवडे, श्रीमती कांताबाई उत्तम उपाडे, श्री.शेषेराव लक्ष्मण बनसोडे, श्री.सुनिल ज्योतीनाथ कांदे व वंजारवाडी गावातील श्री.सुरेश विठ्ठल दराडे, सौ.सत्वशिला सुरेश दराडे, श्रीमती शशिकला राजाभाऊ राठोड, श्री.गणपती रावजी राठोड, श्रीमती गवळणबाई टोपा पवार, श्रीमती लता मधुकर डोईफोडे, श्री.सुखदेव मिठू पवार व अंबाजोगाई तालुक्यातील मुर्ती गावातील सौ.अंजना दिगांबर फड, सौ.संगिता शंकर फड, सौ.सिंधुबाई वैजनाथ दराडे, सौ.सुकूमार धोंडिराम शिंदे, श्री.नाथराव माणिकराव फड, श्री.रामराव सदाशिव फड, श्री.जयराम बामाजी फड हे सदस्य आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी याच उमेदवारांचे अर्ज आल्याने त्यांच्या विजयाची फक्त औपचारिकता  शिल्लक राहिली आहे.

परळी मतदारसंघातील तीन ग्रामपंचायत बिनविरोधक काढल्या बद्दल पालकमंञी ना.धनंजय मुंडे व आ.संजय दौंड यांनी अभिनंदन केले आहे. नव निर्वीचीत सदस्यांचा जगमिञ कार्यालय येथे न.प.गटनेते श्री.वाल्मिक अण्णा कराड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला आहे. जि.प.गटनेते श्री.अजय मुंडे, जि.प.अध्यक्ष श्री.शिवाजीराव सिरसाट, विधानसभा अध्यक्ष व अंबाजोगाई मार्केट कमिटी सभापती श्री.गोविंदराव देशमुख, रा.कॉ.परळी तालुका अध्यक्ष श्री.लक्ष्मणराव पौळ, रा.कॉ.अंबाजोगाई तालुका अध्यक्ष श्री.रंजित लोमटे, श्री.आबासाहेब चव्हाण, मार्केट कमिटी सभापती श्री.गोविंदराव फड आदींनी अभिनंदन केले आहे.


1 comment: