Breaking News

भारत बंदला केजमध्ये प्रतिसाद : विविध पक्ष आणि संघटनांचा सहभाग


गौतम बचुटे । केज 

केज येथे आजच्या भारत बंद आंदोलनात काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटना, शेकाप, वंचित आघाडी, रिपब्लिकन सेना, रिपब्लिकन श्रमिक सेना आणि मुस्लिम संघटना यांच्यासह विविध राजकीय पक्ष आणि संघना भारत बंद आंदोलनात सहभागी झाले होते. 

केंद्र सरकाच्या जाचक शेतकरी विरोधी विधेयक आणि कायद्याला विरोध करण्यासाठी दिल्ली येथे शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. त्या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी आज विरोधी पक्षांनी भारत बंदची हाक दिली होती. त्यासाठी केज येथे आंबेडकर चौकातून आंदोलकांनी रॅली काढून तहसील कार्यालया समोर निदर्शने केली. यात भाई मोहन गुंड, प्रा हनुमंत भोसले, पशुपतीनाथ दांगट, कबिरोद्दीन इनामदार, रत्नाकर शिंदे, किसन कदम, बाबासाहेब मस्के, बाबा मस्के, चंद्रकांत खरात, गोपीनाथ इनकर, मुकुंद कणसे, अनिल रांजनकर, भागवत पवार यांच्यासह प्रमुख कार्यकर्ते व शेतकरी यांनी सहभाग नोंदवून केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी विधेयकाचा निषेध करून शेतकरी आंदोलनाला पाठींबा दिला.No comments