नविन मतदारांनी आपले नाव मतदार यादीत नोंदवावे -शंकर देशमुख
आष्टी : भारत निवडणूक आयोगाच्या मतदारनोंदणी पुनर्निरिक्षण कार्यक्रमांतर्गत शनिवार व रविवार म्हणजेच दि. १२ व १३ डिसेंबर रोजी विशेष कॅंपचे आयोजन करण्यात आले आहे. तरी १८ वर्षे पूर्ण असणाऱ्या सर्व मुले व बाहेर गावाहून विवाहित होऊन आलेल्या मुलींची मतदार नोंदणी करण्यात येणार आहे.या मधे आपले नाव नोंदणी करावी असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सचिव शंकर देशमुख यांनी केले आहे.
प्रसिद्धी पत्रकात शंकर देशमुख यांनी म्हटले आहे की भारतीय निवडणुक आयोगाने नविन १८ वर्ष पूर्ण झालेल्या व विवाह होऊन आलेल्या मुलींची नाव मतदार यादीत नोंदणी तसेच जुन्या मतदारांची नाव, वय, लिंग, फोटो चुकीचा असल्यास ते ही दुरुस्ती करण्यात येईल. त्या साठी निवडणुक आयोगाने शनिवार व रविवार दि १२ व १३ डिसेंबर रोजी विशेष नोंदणी कॅम्पचे आयोजन केले आहे त्यासाठी खालील कागदपत्रे घेऊन आपापल्या मतदान केंद्राच्या BLO शी संपर्क साधावा.
मुल- मुलींसाठी कागदपत्रे
(१) स्वतः चे आधारकार्ड झेरॉक्स
(२) शाळा सोडल्याच्या दाखल्याची झेरॉक्स.
(३) रेशनकार्ड झेरॉक्स/ ग्रांमपंचायत रहिवाशी दाखला.
(४)फोटो १
(५) वडील/ आई चे मतदान कार्ड झेरॉक्स.
*सुनांसाठीची कागदपत्रे*
(१) आधारकार्ड झेरॉक्स.
(२) शाळा सोडल्याचा दाखला झेरॉक्स.
(३) माहेरी मतदारयादीतील नाव कमी केल्याचा/नाव नसलेबाबतचा पुरावा.
(४) फोटो १
(५) पती/सासू/सासरा यांपैकी एकाच्या मतदान कार्डची झेरॉक्स.
(६) सासरी रेशनकार्डमध्ये नाव असल्यास झेरॉक्स.
*दुरुस्तीसाठी*
(१) ज्या बाबींची दुरुस्ती करायची आहे त्या पुराव्याची झेरॉक्स.
(१) फोटो १
वरिल कागदपत्रे घेऊन नविन मतदारांनी आपले नाव त्वरित नोंदवावे असे आवाहन शंकर देशमुख यांनी केले आहे.
No comments