Breaking News

सिंधफना नदीपात्रात दत्ता जाधव यांचे चौथ्या दिवशीही उपोषण सुरू

गेवराई :  तालुक्यातील मौजे कोपरा येथे सिंधफना नदीपात्रात जप्त वाळू बोलीद्वारे लिलाव न करता थेट ठेकेदाराला दिल्याचा आदेश रद्द करून,खुल्या बोलीद्वारे लिलाव करावा व वाळू चोरीप्रकरनी दोषी अधिकाऱ्याची चौकशी करून संबधित अधिकाऱ्यावर कार्यवाही करावी या माफक मागणी घेऊन सामाजिक कार्यकर्ते दत्ता जाधव यांनी सिंधफणा नदीपात्रात सलग चौथ्या दिवशीही कडाक्याच्या थंडीत बेमुदत उपोषण सुरू आहे.

           

गुत्तेदारालाच का वाळूसाठा द्यायचा हे न समजण्याइतकी जनता आता दूतखुळी नाही.खुल्या बोलीद्वारे लिलाव केल्यास आवश्यक असणाऱ्या सर्वसामान्य नागरिकाला वाळू मिळू शकते.परंतु महसूल प्रशासनाला 'त्या' गुत्तेदाराला दिलेला वाळू साठाच का ठेवायचा.?खुल्या बोलीच्या लिलावचे वर्तमापत्रात जाहीर प्रगटन देऊन,खुल्या बोलीद्वारे लिलाव करण्याचे आदेश दिल्यानंतर,लिलावाच्या एक दिवसानंतरच थेट वाळूसाठा गुत्तेदाराला दिला.तसेच वर्तमानपत्रात जप्त वाळुसाठ्याजवळ नवीन वाळूसाठे आहेत हे प्रसिद्ध झाल्यानंतर वाळूसाठे जप्त केले जातात,म्हणजे संबधित महसूल अधिकारी त्या ठिकाणी जप्त वाळूचे खरेच संरक्षण करीत होते की, "वाळूचोरास" संरक्षण देत होते,ही बाबही सर्व नागरिकांना समजली आहे.

जप्त वाळूसाठ्याजवळ अवैध वाळू उत्खनन होते व नवीन वाळूसाठे तयार होतात व हायवा द्वारे वाळू चोरी त्याच ठिकाणाहून होते आणि त्याची माहिती स्थानिक तलाठी व मंडळ अधिकारी यांना मिळत नाही ही बाब अचंबित करणारी आहे.त्यामुळे वाळूचोर व महसूल अधिकाऱ्याचे संगनमत निदर्शनास येते.एवढा गंभीर प्रकरण पुढे येऊनही वरिष्ठ अधिकारी काहीच निर्णय घेत नाहीत यामुळे सर्व नागरिकांत चर्चा सुरू आहे.असेच वरीष्ठ अधिकाऱ्यांनी दाखल न घेतल्यास जनता रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही.उपोषणाची दाखल घ्यावी,या उपोषणास आता वाढता पाठिंबा मिळत असून जिल्हाभरात वाळूविरोधात सामाजिक कार्यकर्त्यांची मोहीम सुरू होईल.
No comments