Breaking News

डोक्याला पिस्तुल लावून चाकूने केली मारहाण केज तालुक्यातील घटना, चौघांविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल

गौतम बचुटे । केज 

कानपट्टीवर पिस्तुल रोखून तुझा भाऊ कुठं गेला अशी विचारणा करत चौघा जणांनी एकाला चाकूने मारहाण केल्याची घटना केज तालुक्यातील बेलगाव येथे घडली. याप्रकरणी चार जणांविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी:  केज पोलीस ठाण्यात पांडुरंग रघुनाथ चौरे यांनी दि.३१ डिसेंबर रोजी तक्रार दिली असून त्यात म्हटले आहे की, दि ३० डिसेंबर रोजी सकाळी ११:०० वा. दरम्यान त्यांच्या गावातील प्रताप नरसिंग दातार, नरसिंग लिंबाजी दातार आणि दोन अनोळखी व्यक्तींनी पांडुरंग चौरे यांच्या बेलगाव येथील घरासमोर जाऊन त्यांच्या डोक्याला पिस्तुल लावून, तुझा भाऊ कुठे गेला ? असे म्हणून चाकूने मारहाण केली. यात फिर्यादी पांडुरंग चौरे याच्या डाव्या हाताच्या पोटरीला दुखापत झाली आहे. भांडण सोडविण्यासाठी आलेल्या फिर्यादीच्या चुलत भावाला पण काठीने व लाथाबुक्यांनी मारहाण करून जखमी केले. अशा प्रकारच्या तक्रारी नुसार केज पोलीस स्टेशनला प्रताप दातार, नरसिंग दातार व इतर दोन अनोळखी व्यक्ती अशा चौघा आरोपी विरुद्ध गु. र. नं.  ५५९/२०२० भा. दं. वि. ३२३, ३२४, ५०४, ५०६ आणि शस्त्रास्त्र कायद्याचे कलम ३/२५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा तपास पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्रीराम काळे हे करीत आहेत.
No comments