Breaking News

साळेगावच्या उपसरपंचाचा राजीनामा मंजूर

गौतम बचुटे । केज 

केज तालुक्यातील साळेगावचे उपसरपंच श्रीमंत गित्ते यांनी दि.३० नोव्हेंबर रोजी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. तो विशेष सभेत मंजूर करण्यात आला. 

या बाबतची माहिती अशी की, साळेगाव ता. केज येथील ग्रामपंचायतीचे उपसरपंच श्रीमंत गित्ते यांनी दि. ३० नोव्हेंबर रोजी आपल्या पदाचा राजीनामा सरपंच कैलास जाधव यांच्याकडे दिला होता. 

सदर राजिनाम्यावर रितसर कार्यवाही करण्या संदर्भात मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८ नुसार सरपंच कैलास जाधव यांनी दि.११ डिसेंबर रोजी एक विशेष सभा बोलावली होती. ही विशेष सभा सरपंच कैलास जाधव यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्या सभेत उपसरपंच श्रीमंत गित्ते यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला. उपसरपंचपद रिक्त झाल्याचा अहवाल पाठविल्या नंतर रिक्त झालेल्या उपसरपंच पदाच्या निवडीसाठी  वरिष्ठ कार्यालयाच्या आदेशाने कार्यवाही होणार असल्याची माहिती ग्रामसेवक दत्तात्रय गव्हाणे यांनी दिली आहे. 

दरम्यान २०२२ या वर्षात ग्रामपंचायतच्या सार्वत्रिक निवडकीत साळेगावचे सरपंचपद हे महिलांसाठी आरक्षित असल्याने पुढच्या रणनितीसाठी उपसरपंच पदाला महत्व आले आहे. यामुळे सदस्यांचा देखील महत्त्व प्राप्त झाले आहे आणि सदस्यांच्या मताची प्रतिष्ठा वाढणार हे निश्चित.


No comments