Breaking News

माजलगाव तहसील समोर अखिल भारतीय संयुक्त किसान मोर्चाचे धरणे आंदोलनबाळासाहेब आडागळे । माजलगाव  

दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी विरोधी काळे कायदे रद्द करा या मागणीसाठी 14 डिसेंबर 2020 रोजी देशभर तहसील कार्यालय व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. 

त्याचाच भाग म्हणून माजलगाव तालुक्यातील डावे पुरोगामी विविध पक्ष संघटनांनी माजलगाव तहसील कार्यालयासमोर सकाळी दहा ते पाच वाजेपर्यंत धरणे आंदोलन केले या आंदोलनात शेतकरी बचाव कृती समितीचे अध्यक्ष काॅ. बाबा सर, शेतकरी बचाव कृती समितीचे उपाध्यक्ष भाई अॅड. नारायण गोले पाटील, शेतकरी बचाव कृती समितीचे सचिव धम्मानंद साळवे,कॉम्रेड दत्ता डाके,सय्यद सलीम बापू, अॅड. सय्यद याकुब, एडवोकेट अशोक डाके, सुदर्शन हिवरकर, भगवान पवार, एडवोकेट सर्जेराव रांजवण,काॅ. साहेबराव फुलगे, दत्ता घुले, बाबासाहेब पवार, पोपट पवार, नाना पवार आदी सह कडू शेतकरी धरणे आंदोलनात सहभागी झाले होते.No comments