Breaking News

महावितरणचा गलथान कारभार पुन्हा चव्हाट्यावर; शॉर्ट सर्किटमुळे शेतकऱ्याचा ऊस जळुन खाक

व्हिडीओ पाहण्यासाठी व्हीडीओवर क्लीक करा

 बीड :  विद्युत महावितरण खाते बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या मुळावर उठले की काय असा प्रश्न उपस्थित होतोय. शेतातून गेलेल्या विद्युत तारेचे घर्षण होऊन बीड तालुक्यातील मण्यारवाडी येथील नारायण जाधव यांच्या शेतातील एक एक्कर पेक्षा अधिक ऊस जळुन खाक झाले आहे. ही घटना दि 23 डिसेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास घडली. 


   

अनेक वेळा विद्युत पोलच्या कट पॉईंट पासून पिके जळण्याबाबतची तक्रार देऊन देखील कसलीच उपाययोजना करण्यात आली नाही, परिणामी शेतकऱ्याचा ऊस जळुन खाक झाला आहे. शेतकरी शेतात उपस्थित असताना देखील ही आग सदर शेतकरी रोखू शकले नाहीत. महावितरणने याबाबतची नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्याने केलीय. हा प्रकार पहिल्यांदा घडलेला नसून यापूर्वीही काही वर्षांत कित्येकदा विद्यूत पोलमुळे ऊस जळलेला असल्याचे नारायण जाधव यांनी सांगितले.
No comments