Breaking News

शेतकऱ्यांमध्ये कृषी कायद्याविषयी 'संभ्रम' निर्माण करण्याचा काँग्रेस आणि वामपंथीयाचा कुटील डाव : आ.सुरेश धस


के. के. निकाळजे । आष्टी

कृषिप्रधान असलेल्या भारत देशातील शेतकरी हा अन्नदाता आहे. शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या अन्नधान्याला चांगला भाव मिळण्यासाठी "दलाली" बंद होणे आवश्यक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अत्यंत चांगले कृषी विषयक कायदे केलेले आहेत. त्यामुळे पंजाब आणि हरियाणा येथील कृषी उत्पन्न बाजार समिती मधील काही दलालांचे कमिशन या नव्या कायद्यामुळे बुडाले असल्यामुळे त्यांनी या आंदोलनाचा उपद्रव्याप केल्याचे दिसून आले विरोधाला विरोध म्हणून काँग्रेस आणि वामपंथीयांनी शेतकऱ्यांमध्ये संभ्रम करण्याचा कुटीलडाव आखला आहे असे प्रतिपादन आ. सुरेश धस यांनी केले.


आष्टी येथे भारतरत्न स्व.अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पीएम किसान सन्मान निधी वाटप शुभारंभ प्रसंगी  'अद्वैतचंद्र' निवासस्थानी शेतकरी संवाद व्हिडिओ कॉन्फरन्सिंग थेट प्रक्षेपण सभा कार्यक्रमानंतर ते बोलत होते. यावेळी सभापती बद्रीनाथ जगताप, प्रफुल्ल सहस्त्रबुद्धे, रंगनाथ धोंडे, अनिल ढोबळे, अशोक मुळे, रमेश तांदळे, सरपंच अतुल कोठुळे, संपत गाडे, सुनील मेहेर, संजय मेहेर, बाळासाहेब थोरवे आदी उपस्थित होते.

ते म्हणाले, कोणत्याही कायद्याच्या अंमलबजावणीनंतर दोन ते तीन वर्षांनी त्यांचे फायदे तोटे दिसून येत असतात त्यानंतर दुरुस्तीही करता येत असते. परंतु विरोधी पक्षाचा हा हटवाद आहे.१९६५ सालापासून भारत देशातील नऊ ते दहा कोटी शेतकऱ्यापैकी केवळ ५९ लक्ष ९० हजार शेतकऱ्यांचे अन्नधान्य भारतीय अन्न महामंडळ (एफसीआय) यांच्याकडे गेले आहे हा उच्चांक आहे. हे शेतकरी सतत फायदा घेत आहेत. पंजाब आणि हरियाणा अपेक्षा महाराष्ट्रातील दुष्काळी शेतकऱ्यांचे दुखणे वेगळे आहे. तीनही कायदे शेतकऱ्यांचे फायद्याचेच आहेत असेही त्यांनी शेवटी सांगितले.No comments