संजय गांधी निराधार योजनेच्या अध्यक्षपदी बालासाहेब बोराडे तर सदस्यपदी शिवसेनेचे शिंदे
गौतम बचुटे । केज
बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांच्या निर्देशा नुसार केज तालुका संजय गांधी निराधार अनुदान योजनेची केज तालुका स्तरीय समिती गठित करण्यात आली आहे.
केज तालुक्यातील गोटेगाव येथील बालासाहेब बोराडे यांची या समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी ही नियुक्ती केली आहे. उर्वरीत समिती सदस्यांची नावे जाहीर केली असून या समितीच्या सदस्यपदी अनुसूचित जातीच्या प्रवर्गातून काँग्रेसचे माजी नगरसेवक कपील मस्के, महिला प्रवर्गातून सौ. प्रणिताताई सोनवणे, इत्तर मागास प्रवर्गातील गोरे व वचीष्ट सांगळे, सर्वसाधारण प्रवर्गातून मधुकर तपसे, दिव्यांग प्रवर्गातून लक्ष्मण काळे, शासन नोंदनिकृत स्वयंसेवी संस्था प्रवर्गातून श्रीकांत घुले, सामाजिक क्षेत्रातून शिवसेनेचे तालुका प्रमुख रत्नाकर शिंदे तर जेष्ठ नागरिक म्हणून नारायण शिंदे यांची निवड करण्यात आली आहे. तसेच गटविकास अधिकारी दत्तात्रय दराडे यांची शासकीय सदस्य म्हणून आणि तहसीलदार मेंढके यांची शासकीय सचिव म्हणून निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल अध्यक्ष आणि सदस्यांचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.
No comments