Breaking News

चिद्रेवार परिवाराने घरात आलेल्या नवीन चिमुकलीचं केलं अनोख्या पद्धतीने स्वागत

परळी : शहरातल्या चिद्रेवार परिवाराने घरात आलेल्या नवीन चिमुकलीचे अनोख्या पद्धतीने स्वागत करत समाजापुढे नवीन आदर्श घालून दिला आहे. मुलीच्या जन्माचे रथातून वाजत- गाजत मिरवणूक काढत चिद्रेवार परिवाराने आपल्या परिवारात जन्माला आलेल्या कन्येरूपी लक्ष्मीचे पूजन केलेले पहायला भेटले.

शहरातील पद्मावती भागात राहणाऱ्या अभिषेक चिद्रेवार या दांपत्याला कन्या रत्न प्राप्त झाले.याचा आनंद त्यांनी त्या मुलीचे स्वागत रथातून मिरवणूक काढत तर केला. गणेशपार रोड पासून ते पद्मावती गल्लीतील राहत्या घरापर्यंत सवाद्य मिरवणूक काढली गेली.या मिरवणूकीत महिला-पुरुष सहभागी झाले होते. मुलीच्या जन्माने आनंदित झालेल्या चिद्रेवार परिवाराने गल्लीत पेढे जिलबीही वाटली. मुलीच्या जन्माचे कोणत्या पद्धतीने करावे याचे उत्तम उदाहरण या परिवाराने दाखवून दिले आहे.
No comments