Breaking News

देवेंद्रसिंग ढाका निर्भीड पत्रकार संघाच्या जिल्हाध्यक्षपदी


बीड : पत्रकारांच्या न्याय-हक्कासाठी महाराष्ट्रात लढा देणार्‍या निर्भीड पत्रकार संघाच्या बीड जिल्हाध्यक्षपदी पत्रकार देवेंद्रसिंग ढाका यांची निवड सर्वानुमते करण्यात आली. निर्भीड पत्रकार संघाच्या संस्थापक अध्यक्षा सौ.रूचिता मलबारी यांच्या सूचनेवरून प्रदेशाध्यक्ष शेख तय्यब यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सर्वानुमते ढाका यांची निवड करण्यात आली. 
बीड जिल्ह्यातील पत्रकार बांधवांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी सदैव प्रयत्नशील असणार तसेच विशेष करून ग्रामीण भागातील पत्रकारांना येणार्‍या समस्यांचे निराकारण करण्यासाठी निर्भीड पत्रकार संघाच्या माध्यमातून कटीबध्द राहणार असल्याचे नियुक्तीच्या वेळी देवेंद्रसिंग ढाका यांनी म्हटले. निर्भीड पत्रकार संघाचे शहराध्यक्ष एस.एम. युसूफ उपाध्यक्ष शेख मोहंमद मोईनोद्दीन, जेष्ठ पत्रकार अनिलजी ससाणे यांच्यासह पत्रकार क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

No comments