Breaking News

उषाबाई बालासाहेब राजूरकर यांचे निधनपरळी वैजनाथ : परळी शहरातील रहिवासी असलेल्या श्रीमती उषाबाई बालासाहेब राजूरकर यांचे आज दि.7 सोमवार रोजी दुपारी 4 वा निधन झाले.मृत्यूसमयी त्यांचे वय 62 वर्षे होते. शहरातल्या वैद्यनाथ मंदिरातील क्षेत्रोपाध्याय स्व.बालासाहेब राजूरकर यांच्या त्या पत्नी होत्या.

अंबेवेस परिसरातील रहिवासी असलेल्या श्रीमती उषाबाई बालासाहेब राजूरकर यांचे आज अल्पशा आजाराने निधन झाले.त्यांच्या पश्चात 4 मुले सुने नातवंडे असा परिवार आहे.मुंबई - पुणे हायकोर्ट येथील जेष्ठ विधीज्ञ ऍड गिरीश राजूरकर ,वैद्यनाथ मंदिरातील क्षेत्रोपाध्याय शिरीष व नितीन,नवनीत राजूरकर यांच्या त्या आई होत.श्री विठ्ठलरुक्मिणी महिला भजनी मंडळ व धार्मिक मनमिळाऊ स्वभावामुळे त्या सर्वत्र परिचित होत्या.श्रीमती उषाबाई राजूरकर यांच्या पार्थिवावर वकुंठधाम स्मशानभूमीत सायंकाळी 6 वा अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यांच्या निधनाने राजूरकर परिवाराच्या दुःखात दृष्टीकोन न्युज परिवार सहभागी आहे.


No comments