Breaking News

शिव संघर्ष ग्रुप बीड जिल्ह्यात कोणावरही अत्याचार होऊ देणार नाही : रवींद्र पाटोळे


बीड : जिल्ह्याचे नवीनच रुजू झालेले पोलिस अधीक्षक आर. राजा यांची भेट घेऊन शिव संघर्ष ग्रुप व मानवी हक्क अभीयानचे जिल्हा सरचिटणीस सुरेश पाटोळे यांनी जिल्ह्यात होत असलेल्या अल्प संख्यांक समाजावर सामुहिक हल्ले संदर्भात चिंता व्यक्त करून आपण वैक्तिक लक्ष घालून आरोपींना अटक करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करून निःपक्षपाती काम करावे अश्या सूचना दिल्या.

     

यावेळी शिव संघर्ष ग्रुप चे सामाजिक कार्यकर्ते रविंद्र पाटोळेसह प्रसिद्ध गायक किशोर धुताडमल, मानवी हक्क अभियान चे शहराध्यक्ष नितीन अडागळे, संतोष पाटोळे, पोलिस पाटील कानडे इत्यादी उपस्थित होते. बीड जिल्ह्यातील अल्प संख्याक समाजावरील वाढते अत्याचार, शेतकरी आत्महत्या या विषयावर सविस्तर चर्चा केली व जिल्ह्यातील प्रामुख्याने अल्प समाजावरील वाढते अत्याचार थांबऊन त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी बीड जिल्ह्याचे आर राजा साहेब यांची भेट घेऊन केली. तसेच माजलगाव तालुक्यातील हिवरा येथील अवघडे कुटुंबिय त्यांच्यावर ग्रामस्थांकडुन झालेला भ्याड हल्ला व अत्याचार यावर चर्चा करून त्यांना न्याय द्यावा. त्यांना गावगुंडाकडून होत असलेल्या त्रासाला गोरगरीब समाज वैतागला आहे त्यामुळे त्यांना संरक्षण दयावे.   

        

गावपातळीवर अल्प संख्यांक समाजाला गुलामीची वागणूक दिली जाते त्यांचे सर्व अधिकार हिरावून घेण्याचे काम आजही गावगुंडाकडून केले जाते अश्या गावगुंडाला त्वरित अटक करू तसेच कोणीही कायदा हातात घेणार नाही. तसा प्रयत्न केला तर त्यांच्यावर कठोर कारवाई करू असे अश्वासन पोलीस अधीक्षक आर राजा यांनी दिले. हिवरा गावातील कुटुंबावरील भ्याड हल्ला यांचा शिव संघर्ष ग्रुप महाराष्ट्र राज्य तीव्र शब्दात जाहीर निषेध करीत आहे.
No comments