Breaking News

अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार


बाबासाहेब देशमाने । दिंद्रुड 

दिंद्रुड परिसरात गेल्या कांही दिवसांपासुन दुचाकीला धडक बसुन अपघात होण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असुन, ही अपघात मालिका सुरूच आहे. काल शुक्रवारी सायंकाळी ६ वाजे दरम्यान बीड परळी महामार्गावर दिंद्रुड जवळ एका  अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकी स्वार जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

   

सचिन आनंद भोळे (वय ३८ वर्ष) रा. १०१६ पांढरी विठ्ठल मंदिर जवळ नांदेड, असे मयत इसमाचे नाव व पत्ता आहे.    शुक्रवारी सायंकाळच्या दरम्यान मोटार सायकल एम पी ४१ एम एल १८६८ ने परळी कडुन औरंगाबाद कडे जात असताना दिंद्रुड जवळील हाकेच्या अंतरावर भरधाव वेगात बीड कडुन परळी कडे जाणाऱ्या  एका वाहनाने त्यास जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात सदर दुचाकीस्वाराच्या  डोक्यास जबर मार लागुन जागिच ठार झाला.अपघात इतका भिषण होता की, हेल्मेट तुकडे पडून डोक्याला गंभीर मार लागुन सचीन भोळेचा जागीच मृत्यू झाला.

दिंद्रुड पोलीसांनी घटनास्थळी दाखल होत मयतास माजलगाव ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल केल्याची माहिती दिंद्रुड ठाणे प्रमुख अनिल गव्हाणकर यांनी दिली. दरम्यान गेल्या कांही दिवसांपासुन या परिसरात अपघातांचे प्रमाण वाढत असुन,दोन दिवसांपूर्वीच दिंद्रुड पासुन जवळच असलेल्या बेलोरा फाट्यावर दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने एक जण जागीच ठार झाला होता.एक दिवस मध्ये जाताच आज परत हा अपघात होऊन यातही एक जण ठार झाल्याची घटना घडली. या वाढत्या अपघातांच्या घटनांमुळे दिंद्रुड परिसरात चिंता व्यक्त केली जात आहे.


No comments