Breaking News

गंठन चोरांचा केज तालुक्यात धुमाकूळ !

लव्हुरी व युसुफवडगावात महिलेच्या गळ्यातील दागिने ओरबाडून चोर झाले पसार : महिलांमध्ये भीतीचे वातावरण 

Zzzzzzzzzzzzz

गौतम बचुटे । केज  

तालुक्यातील लव्हुरी येथील केज पोलीस स्टेशनच्या हद्दीत शेतातुन सरपण घेऊन घराकडे निघालेल्या महिलेला चार अनोळखी इसमानी अडवून तिच्या गळ्यातील दागिने घेवून फरार झाले. तर युसुफवडगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीतील होळ येथेही शेतात खुरपणी करीत असलेल्या महिलेच्या गळ्यातील दागिने एका अल्पवयीन मुलाने हिसकावून घेतल्याचा प्रकार घडला आहे.


Zzzzzzzzzzzzz

या बाबतची माहिती अशी की, दि. २३ डिसेंबर रोजी सायंकाळी ६:०० वा. च्या दरम्यान अर्चना रामराव वायकर ही २५ वर्षीय महिला त्यांच्या धायचरा नावाने ओळखल्या जात असलेल्या शेतातून डोक्यावर सरपण घेऊन येत असताना तिला रस्त्यात अडवून एकाने मागून केस ओढले व दुसऱ्याने तिचे तोंड कपड्याने बांधून ओढीत ज्वारीच्या पिकात घेऊन गेले.


त्या ठिकाणी ज्वारीच्या शेतातही दोन इसम थांबलेले होते. त्यांनी तिला ओरडल्यास जीवे मारून टाकण्याची धमकी दिली व गळ्यातील मंगळसूत्र, गंठण आणि कानातील झुंबर असे सुमारे पंचविस हजार रु. किंमतीचे दागिने काढून घेत पोबारा केला. या प्रकारामुळे घाबरून अर्चना वायकर ही शेतात बेशुद्ध पडली. त्या नंतर घरच्या लोकांनी तिचा शोध घेतला असता ती त्यांना आढळून आली. नंतर तिच्यावर केज येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. 

Zzzzzzzzzzzzz

दि.२५ डिसेंबर रोजी केज पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादी नुसार केज पोलीस स्टेशनला गु.र.न. ५५२/२०२० भा.दं.वि. ३९२, ५०६, ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक श्रीराम काळे व हेडकॉन्स्टेबल दिनकर पुरी हे तपास करीत आहेत. 

Zzzzzzzzzzzzz

दुसऱ्या  होळ येथील घटनेत शितल दयानंद शिंदे (वय २९ वर्ष ) ही महिला २३ डिसेंबर रोजी गावालगतच्या 'गावकर' नावाच्या शेतात खुरपणी करीत होती. ती एकटीच आणि खुरपणी करण्यात व्यग्र असल्याची संधी साधून गावातील १६ वर्ष वयाच्या ओमकार बालासाहेब केंद्रे या मुलाने या महिलेच्या पाठीमागून अचानक आला.


त्याने शितल शिंदे यांच्या गळ्यातील २५ हजार रुपये किंमतीचे एक तोळ्याचे मणी मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावून घेत तेथून पोबारा केला. शितल शिंदे यांच्या फिर्यादीवरून ओमकार केंद्रे या अल्पवयीन मुला विरुद्ध युसुफवडगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला आहे. याचा तपास पोलीस उपनिरीक्षक सिमाली कोळी करीत आहेत. केज तालुक्यातील या महिलेचे दागिने हिसकावून घेण्याच्या घटनेमुळे केज तालुक्यात शेतात काम करणाऱ्या महिलांत भीतीचे वातावरण पसरले असून दहशत निर्माण झाली आहे.

Zzzzzzzzzzzzz

No comments