Breaking News

शिरूर घाटमध्ये विवाहितेची गळफास घेवून आत्महत्या


गौतम बचुटे । केज  

केज तालुक्यातील शिरूर घाट येथे एका ३५ वर्षीय महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केली.

या बाबतची माहिती अशी की, शिरूरघाट येथील सौ गोदावरी रमेश सांगळे वय ३५ वर्ष या महिलेने दि.१३ रोजी पहाटे ४:३० ते ५:०० च्या सुमारास घरा समोरील बाभळीच्या झाडाला सुती दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. दरम्यान सदर महिलेचा पती हा कामा निमित्त पुणे येथे असताना तिच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट झालेले नाही. या बाबत केज पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येत आहे. सदर महिलेला दोन मुली व एक मुलगा असे अपत्ये आहेत.


No comments