Breaking News

आरक्षण वाचविण्यासाठी ओबीसींनो रस्त्यावर या


बाबासाहेब देशमाने । दिंद्रुड 

ओबीसीचे आरक्षण वाचवायचे आसेल तर साळ्या, माळ्या, कोळ्या, लोहार सुतार सोनर नाव्ही  कुंभार, तेली तांबोळी पिंजारी, हाटकर धनगर कैकाडी वढर जंगम जंगम वाणी ओबीसी समाजातील सर्व विधारथी युवक युवती बेरोजगार नोकरदार राजकारणी  आदी समाज बांधवानी एक होऊन ओबीसी बचाव मोर्चास हजारोंच्या संख्येने उपस्थित रहावे.

  

ओबीसी समाजाचे अस्तित्व संपुष्टात आणण्यासाठी  छत्रपती शिवाजी महाराज प्रबोधिनी या संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब सराठे यांनी याचिकेद्वारे मुंबई उच्च न्यायालयात ओबीसी व्हीजेएनटी एसबीसी जाती, जमातीचे आरक्षण बंद करण्याची मागणी केली आहे. तसेच काही मराठा संघटनांनी आम्ही ओबीसी आहोत ओबीसी प्रवर्गातील इतर सर्व जाती बाजूला काढून मराठा समाजाला ओबीसी म्हणून आरक्षण ध्यावे अशी मागणी उच्च न्यायालयात केली आहे. 

ओबीसी समाज रस्त्यावर उतरला तरच ओबीसीचे अस्तित्व यापुढे राहणार आहे. जर आरक्षण संपले तर ओबीसी संपला .  कायम आरक्षण  ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय बीड येथे अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद बीड जिल्हा व सर्व ओबीसी संघटनांच्या वतीने दि. 8 डिसेंबर 2020 रोजी ओबीसी आरक्षण बचाव मोर्चास हजारोंच्या संख्येने उपस्थित रहावे असे आव्हान अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे माजलगाव तालुका उपाध्यक्ष राजेभाऊ कटारे यांनी केले आहे.No comments