Breaking News

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा मोगरा येथील दोन दिवशीय खंडोबा यात्रा रद्द


भाविकांना दर्शनासाठी गर्दी करु नये - पुजारी शिवराज महाराज भरडे

बाळासाहेब आडागळे । माजलगाव  

तालुक्यातील मोगरा येथे  दरवर्षी चंपाषष्ठीला मोठ्या उत्साहात दोन दिवशीय भरणारी खंडोबा यात्रा यंदा मात्र पोलीस व प्रशासनाच्या सुचनेवरुन यात्रेतील होणारी गर्दी टाळण्यासाठी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आली असुन भाविकांनी दर्शनासाठी गर्दी करु नये असे आवाहन खंडोबा देवस्थानचे पुजारी शिवराज महाराज भरडे यांनी केले आहे.

माजलगाव तालुक्यातील मोगरा येथील जार्गत असलेले  खंडोबा देवस्थान असुन दरवर्षी चंपाषष्ठीला मोठ्या उत्साहात साजरी होणारी यात्रा भरत असते,या यात्रेसाठी राज्यातुन मुंबई, ठाणे,पुणे व औरंगाबाद या मोठ्या शहरातुन भावीक दर्शनासाठी व यात्रेसाठी येत आसतात,या दोन दिवशीय चालत असलेल्या यात्रेत पहिल्या दिवशी छबिना व गाड्या ओढण्याचा कार्यक्रम आसतो तर दुसऱ्या दिवशी जंगी कुस्त्याच्या कार्यक्रमानें सांगता होते.यावर्षी घटस्थापना आज दि ११ डिसेंबर शुक्रवार रोजी होणार आहे,तर यावर्षी दरवर्षी प्रमाणे दोन दिवशीय भरणारी मोगरा  येथील खंडोबा यात्रा तालुका प्रशासन व पोलीस प्रशासानाच्या सुचनेवरुन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चंपाषष्ठीला होत आसलेली मोगरा येथील खंडोबा यात्रा यंदा रद्द करण्यात येत असुन भाविकांना दर्शनासाठी गर्दी करु नये असे आवाहन मोगरा येथील खंडोबा देवस्थानचे पुजारी शिवराज महाराज भरडे यांनी भाविकांना केले आहे.


No comments