Breaking News

कलेक्टर साहेब आधी वाळू द्या मग घरकुल न बांधणाऱ्यांवर कारवाई करा- ॲड.सदानंद वाघमारे


बीड : रमाई आवास योजना इंदिरा गांधी घरकुल योजना तसेच पंतप्रधान योजनेमधून लाभार्थ्यांना घरकुल बांधण्यासाठी अनुदान दिले जाते ते अनुदान गोरगरीब शेतकरी कष्टकरी कामगारांना परवडण्यासारखे नाही एकीकडे या लाभधारकांना वाळू उपलब्ध होत नसल्यामुळे घरकुल बांधण्यासाठी अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

यामध्येच वाळू उपलब्ध होत नसल्यामुळे अनेक लाभार्थ्यांना आपल्या स्वतःच्या हक्काचे घरकुल बांधता आले नाही.तसेच अनेक लाभार्थ्यांना त्यांच्या काही घरगुती अडचणीमुळे व वाळू उपलब्ध होत नसल्यामुळे घरकुल बांधणे शक्य झाले नाही.या मध्येच अधिकची भर म्हणून माननीय बीड जिल्हाधिकारी साहेब यांनी घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांवर फौजदारी कारवाई करण्याचे आदेश देत आहेत ते सर्वसामान्य गोरगरीब लाभार्थ्यांना वेठीस धरण्याचे काम होत असल्याचा आरोप ॲड. सदानंद वाघमारे यांनी केला आहे. कलेक्टर साहेब फौजदारी कारवाई करण्याच्या अगोदर लाभार्थ्यांना शासनाच्या रास्त भावामध्ये वाळू उपलब्ध करून देण्याची मागणी जनप्रहार सामाजिक संघटनेचे सचिव तथा विधी सल्लागार ॲड.सदानंद वाघमारे यांनी जिल्हाधिकारी बीड यांना मागणी करणार असल्याचे म्हटले आहे.घरकुल योजने मध्ये जे लाभार्थी आपल्या स्वतःच्या हक्काचे घरकुल तयार करण्यासाठी धडपडत आहेत त्यांना वेठीस  धरण्यापेक्षा शासनाने त्यांना वाळू रास्त भावात उपलब्ध करून देऊन त्यांना कुशल इंजिनीयर च्या मार्फत घरकुल बांधण्याची व्यवस्था देखील करण्याची मागणी यावेळी जनप्रहार सामाजिक संघटनेचे विधी सल्लागार तथा सचिव ॲड. सदानंद वाघमारे यांनी जिल्हाधिकारी बीड यांच्याकडे करणार आहेत असे प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात कळवले आहे.


No comments