Breaking News

पिण्याच्या पाण्यासाठी न. पा. प्रशासनाकडून नागरिकांची जाणीवपूर्वक हेटाळणी : प्रशांत डोरले


बीड :  शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या बिंदुसरा व माजलगाव येथील दोन्ही ही धरण जवळपास पूर्ण क्षमतेने भरले गेलेले आहेत, असे असताना ही बीड नगर पालिका शहराला दहा ते बारा दिवसाला तर कधी कधी मध्य रात्री पाणीपुरवठा करत आहे, यातुन नागरिकांना विशेषत घरातील महिला वर्गाला त्रास होत आहे, नगर पालिका प्रशासन जाणीवपूर्वक तर नागरिकांचा छळ करत नाही ना ? असा प्रश्न अश्या वेळी उपस्थित होत असल्याचे प्रसिध्दी पत्रकाद्वारे शिवसंग्रामचे प्रशांत डोरले यांनी केला आहे.

सविस्तर असे की, बीड जिल्ह्यातील सर्वच भागात या वर्षी पावसाचे प्रमाण हे समाधानकारक आहे, त्यातुनच शहरालगत असलेले सर्वच नदी, तलाव हे ओव्हर फ्लो झालेले आहेत, माजलगाव बॅक वॉटर व बिंदुसरा धरण ही पूर्ण क्षमतेने भरले गेले आहेत, परंतु आज ही बीड शहरातील जवळपास सर्वच भागातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी दहा ते बारा दिवसाची वाट पहावी लागत आहे.

 

बीड शहरातील अत्याधुनिक विकसनशील असलेली नगर पालिका* व त्याचा कार्यभार हाकणारे *भुषणावह* प्रशासनाने बीड शहरातील लोकांना नाहक त्रास देण्याशिवाय दुसरे कामच केलेले दिसत नाही. नगराध्यक्ष साहेबांच्या गेल्या तीस वर्षांच्या काळात शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या एकच ठिकाणी फिल्टर होते. त्या ठिकाणी फिल्टर पाणी शहरातील इतर १६ ठिकाणी असलेल्या टाक्यांमधून शहराला सोडले जाते, परंतु पाणी सोडण्याचा वेळी या नियमित दिसत नाहीत, कधी रात्री तर कधी मध्य रात्री ही पाणी सोडण्याचे प्रताप न. प. कर्मचारी काढून होत आहेत.

या बाबत न. पा. प्रशासनाला वेळोवेळी चौकशी केली असता माजलगाव येथील काडी वडगाव व ईट या ठिकाणी असलेल्या फिल्टर ला लाईट व पाइपलाइन खराब हीच कारणे पुढे केली जात आहेत, वास्तविक पाहता एक हाती सत्ताधीश असताना ही हे प्रश्न कायम असणे ही नगर पालिका प्रशासनासाठी लज्जेची बाब आहे, जर हे प्रकार असेच चालु राहिले व शहरातील नागरिकांना नियमित पाणी पुरवठा न केल्यास माय बाप जनता सोडणार नाही असे प्रसिध्दी पत्रकाद्वारे शिवसंग्रामचे प्रशांत डोरले यांनी सांगितले आहे.No comments