Breaking News

महाराष्ट्र पत्रकार संघाचा मुकनायक पुरस्कार पत्रकार महेंद्रकुमार मुधोळकर व प्रा.शेख सत्तार यांना जाहीर

 
माजलगाव भूषण पुरस्काराने बाबुराव पोटभरे, डॉ. जी. आर. देशपांडे, चंद्रकांत शेजुळ यांचा होणार सन्मान


माजलगाव :  महराष्ट्र पत्रकार संघाच्या वतीने मुकनायक व माजलगाव भूषण पुरस्कार गेल्या वर्षांपासून देण्यात येत असुन या वर्षिचा मुकनायक पुरस्कारासाठी बिड येथील टि.व्हि.९ मराठी चे पत्रकार महेंद्रकुमार मुधोळकर व सा.माजलगाव पत्रिकाचे संपादक प्रा.शेख सत्तार यांना जाहिर करण्यात आले आहेत तर माजलगाव भुषण पुरस्कार बहुजन विकास मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष बाबुराव पोटभरे,प्रसिद्ध डाँ.जि.आर.देशपांडे व तुळजाभवानी आर्बनचे संस्थापक अध्यक्ष तथा जि.प.सदस्य चंद्रकांत शेजुळ यांना जाहीर करण्यात आला असुन या पुरस्काराचे वितरण लवकरच विविध मान्यवरांच्या  उपस्थितीत पार पडणार असल्याची माहिती, महाराष्ट्र पत्रकार संघाचे अध्यक्ष वाजेद खाँ पठाण यांनी दिली आहे.

महाराष्ट्र पत्रकार संघ शाखा माजलगावच्या वतीने दरवर्षी पत्रकारीता क्षेत्रासह सामाजिक,आरोग्य सांस्कृतिक, कला क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी करणार्‍या बिड जिल्ह्याच्या मातीतील व्यक्तीस मुकनायक व माजलगाव भूषण पुरस्कार देऊन  दरवर्षापासून सन्मानीत करण्यात येत आसते. त्याच प्रमाणे यावर्षीचे पत्रकारीतेतील योगदानाबद्दल बिड येथील टि.व्ही.९ मराठी चे पत्रकार महेंद्रकुमार मुधोळकर व सा.माजलगाव पत्रिकाचे संपादक प्रा.शेख सत्तार यांना जाहीर करण्यात आला आहे तर माजलगाव भुषण पुरस्कार बहुजन विकास मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष बाबुराव पोटभरे ( सामाजिक ),माजलगाव शहरातील प्रसिद्ध डाँ. जि.आर.देशपांडे (रुग्ण सेवा ) व तुळाजा भवानी आर्बनचे संस्थापक अध्यक्ष,जि.प.सदस्य तथा जि.म.स.बँकेचे संचालक चंद्रकांत शेजुळ (सहकार ) यांना जाहीर झाला असुन   लवकरच विविध नामांकित मान्यवरांच्या उपस्थितीत भव्यदिव्य पुरस्कार वितरण सोहळा पार पडणार असल्याची माहिती महराष्ट्र पत्रकार संघाचे अध्यक्ष वाजेद खाँ.पठाण, उपध्याक्ष ज्योतिराम पाढंरपोटे,सचिव बाळासाहेब आडागळे यांनी दिली आहे.
No comments