Breaking News

विवाहितेचा विनयभंग


गौतम बचुटे । केज 

तालुक्यातील सासुरा येथे शेतात गेलेल्या म्हशी बाहेर काढ असे सांगितले म्हणून एका विवाहित महिलेचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे.

या बाबतची माहिती अशी की, दि. १९ डिसेंबर शनिवार रोजी दुपारी १२:०० वा. च्या दरम्यान केज तालुक्यातील सासुरा येथील शिवारातील शेतात सुहास वसंत उगले यास एक विवाहित महिला तुझ्या  म्हशी शेताबाहेर बाहेर काढ असे म्हणाली. त्या नंतर ती महिला तिचे जनावरे शेतात बांधीत असताना सुहास उगले याने तिला मारहाण करीत विनयभंग केला. तसेच कुणाला हा प्रकार सांगितला तर जिवे मारण्याची धमकी दिली. पिडीत महिलेने केज पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारी नुसार गु. र. नं. ५३४/२०२० भा. दं. वि. ३५४, ३२३, ५०४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास मुकुंद ढाकणे हे करीत आहेत.




No comments