Breaking News

प्रत्येक महामंडळाला एक हजार कोटी रूपयांचा निधी द्यावा

 

उपेक्षित समाज संघटनेची मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे मागणी

बाळासाहेब आडागळे । माजलगाव 

विवीध महामंडळाचे संपुर्ण कर्ज माफ करण्यात यावे, रोजगार निर्मीतीला प्रोत्साहन मिळावे आणि आर्थिक उन्नतीसाठी स्वंयरोजगाराला चालना देण्याच्या उद्देशाने प्रत्येक महामंडळास एक हजार कोटी रूपये निधी उपलब्ध करून देण्यात यावा या मागणीचे निवेदन तहसिलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना उपेक्षित समाज संघटनेचे अध्यक्ष अॅड. गौतम मिसाळ, सचिव अॅड. बी. एस. नाडे यांनी दि. 21 डिसेंबर रोजी दिले आहे.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राज्य शासनाने व्यक्ती, कुटूंब व समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी स्वंयरोजगाराला चालना देण्याच्या उद्देशाने महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ (म.) मुंबई, साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाउ साठे विकास महामंडळ (म.) मुंबई, संत रोहिदास चर्म उद्योग व चर्मकार विकास महामंडळ (म.)मुंबई, वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ (म.)मुंबई, महाराष्ट् राज्य ईतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ(म.) मुंबई, महाराष्ट् राज्य अपंग वित्त व आर्थिक विकास महामंडळ (म.) मुंबई, महिला आर्थिक विकास महामंडळ (म.) मुंबई, आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ (म.) मुंबई, अहिल्याबाई होळकर शेळी, मेंढी पालन विकास महामंडळ (म.) मुंबई, खादी ग्राम उद्योग महामंडळ (म.) मुंबई, जिल्हा उद्योग केंद्र, मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळ (म.) मुंबई यासह विवीध विकास महामंडळाची स्थापना केलेली आहे.

 

कोरोना संकटात सर्वाधिक नुकसान विवीध महामंडळ व बॅंकामार्फत कर्ज घेतलेल्या बेरोजगार तरूणांनी वैयक्तिक उद्योग तथा स्वयंरोजगाराकरीता उद्योग उभारलेल्या व्यावसायिकांचे झालेले आहे. सुशिक्षीत बेरोजगारांनी सुरू केलेले उद्योग कोरोनामुळे डबघाईला आलेले आहेत. त्यामुळे हे सुशिक्षीत तरूण विवीध महामंडळाचे व बॅंकांचे कर्ज परत फेडु शकत नाहीत. त्यामुळे शासनाने विवीध महामंडळाचे संपुर्ण कर्ज माफ करावे व प्रत्येक महामंडळास एक हजार कोटी रूपये निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी तहसिलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना उपेक्षित समाज संघटनेचे अध्यक्ष अॅड. गौतम मिसाळ, सचिव अॅड. बी. एस. नाडे यांनी दि. 21 डिसेंबर रोजी दिले आहे.
No comments