वाघेबाभूळगाव येथे शाळकरी मुलाची आत्महत्या
गौतम बचुटे । केज
तालुक्यातील वाघे बाभूळगाव येथे एका १६ वर्षीय शाळकरी मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
या बाबतची माहिती अशी की, स्वप्नील युवराज जिरे (वय १६ वर्ष) हा आजीकडे व वाघेबाभुळगाव येथे राहत होता. तो इयत्ता दहावीच्या वर्गात शिक्षण घेत होता. स्वप्नील याने २५ डिसेंबर रोजी सकाळी १०:०० वा. च्या सुमारास आजीच्या शेताकडे जात असताना वाटेत शेतातील झाडास गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याने आत्महत्या का केली? याचे कारण स्पष्ट झाले नाही.
नांदूरघाट येथील ग्रामीण रुग्णालयात मृतदेहाची उत्तरीय तपासणी करून त्याच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून नांदूरघाट दुरक्षेत्र पोलीस चौकीचे हेडकॉन्स्टेबल मुकुंद ढाकणे हे पुढील तपास करत आहेत.
No comments