शेतकऱ्यांनी १९ डिसेंबर पर्यंत कापूस नोंदणी करावी - सभापती संभाजी शेजुळ
बाळासाहेब आडागळे । माजलगाव
तालुक्यातील कापूस उत्पादक शेतकरी बांधवांना शासकीय कापूस खरेदी हंगाम 2020-21ऑनलाईन कापूस नोंदणीसाठी 30 नोव्हेंबर पर्यंत मुदत दिली होती परंतु नोंदी अभावी शिल्लक राहिलेल्या शेतकरी बांधवानी मा. जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे ऑनलाईन कापूस नोंदणीसाठी मुदत वाढवून द्यावी अशी मागणी केली होती.
त्यावर मा. जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून दिनांक 19 डिसेंबर पर्यंत ऑनलाईन कापूस नोंदणीसाठी मुदतवाढ दिली आहे तरी नोंदी अभावी शिल्लक असलेल्या शेतकरी बांधवांनी बाजार समिती कार्यालयांमध्ये सातबारा, पीक पेरा प्रमाणपत्र, आधार कार्ड (झेरॉक्स), बँक पासबुक झेरॉक्स (राष्ट्रीयकृत), एक फोटो ,मोबाईल नंबर इत्यादी कागदपत्रे देऊन ऑनलाईन कापूस नोंदणी करावी असे आवाहन बाजार समितीचे सभापती संभाजी आबा शेजुळ,सचिव एच.एन.सवणे यांनी केले आहे.
No comments