Breaking News

जनविकास सामाजिक संस्थेच्या वतीने केज पंचायत समितीत मास्क वाटप


 गौतम बचुटे । केज 

केज पंचायत समितील कर्मचाऱ्यांना जनविकास सामाजिक संस्थेचे रमेश भिसे यांनी मास्कचे वाटप केले.

या बाबतची माहिती अशी की, कोरोना काळात पंचायत समितीतील कर्मचारी हे लोकांचे काम करीत आहेत. त्यांना त्यांच्या स्वतःच्या जीविताची व कुटुंबाची काळजी घेण्यासाठी जनविकास सामाजिक संस्थेचे रमेश भिसे यांनी अरविंद अँडव्हान्स मटेरियल आणि गुड शेअर यांच्या संयुक्त विद्यमाने दि. ३ डिसेंबर रोजी एन-९५ मास्कचे वाटप करण्यात आले. यावेळी जनविकास सामाजिक संस्थेचे रमेश भिसे तसेच माजी सभापती संदीप जाधव पाटील, पिंटू ठोंबरे, भुसारी आप्पा, गटविकास अधिकारी दत्तात्रय दराडे विविध विभागातील खाते प्रमुख व कर्मचारी यांच्यासह जनविकासचे मच्छिन्द्र लांडगे, विजय भिसे व पत्रकार गौतम बचुटे उपस्थित होते.


No comments