Breaking News

बीड राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसा निमित्त ,भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन


रक्तदान देऊन बीड शहराचा राज्यात आदर्श घडवूया -आ. संदीप  क्षीरसागर

आम्ही सहभागी होत आहोत आपणही सहभाग व्हावे.....

बीड :  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वेसर्वा शरदचंद्र पवार साहेब यांच्या वाढदिवसा निमित्त बीड राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने  विक्रमी ,भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे,बीडचे आमदार संदीप (भैया) क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली होत असलेल्या वाढदिवसाच्या कार्यक्रमा मध्ये सर्वांच्या उपयोगाला पडणाऱ्या अशा समाज उपयोगी, लोक हिताचे कार्यक्रम घेऊन साजरा केला जानार आहे.अनावश्यक गोष्टीं वरती खर्च न करता बॅनरबाजी टाळून 12 डिसेंबर रोजी शरदचंद्र पवार साहेब यांचा वाढदिवस बीड शहरात अनोख्या पद्धतीने साजरा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. 

 

सर्वप्रथम शरदचंद्र पवार साहेब यांच्या दीर्घायुष्य लाभावे यासाठी सकाळी सात वाजता खंडेश्वरी येथील हनुमान मंदिरात अभिषेक त्यानंतर उमर शावली दर्ग्यावर चादर अर्पण करणे,गरजवंत विद्यार्थी शैक्षणिक साहित्य व किराणा वाटप व थंडीचे दिवस असल्यामुळे ब्लँकेट वाटप करून, आदर्श, विक्रमी ,भव्य रक्तदान शिबिराला सुरुवात करण्यात येणार आहे,त्या अनुषंगाने राष्ट्रवादी भवन बार्शी रोड बीड या ठिकाणी सकाळी आठ वाजल्या पासून सायंकाळी सहा वाजेपर्यंत हे शिबिर घेतले जानार आहे.

 कोरोणाच्या काळामध्ये प्रचंड प्रमाणात महाराष्ट्रात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे , ही जाणीव ठेवून साहेबांच्या वाढदिवसा निमित्त जास्तीत जास्त रक्तदान देऊन बीड शहराचे नांव महाराष्ट्रात गाजवायचे आहे, विक्रमादित्य म्हणून मान नोंदवण्याचा संकल्प करण्यात आला आहे, बीड शहरात या निमित्त रक्तदात्यांचा उच्चांक निर्माण व्हावा असं संयोजकांच्या वतीने नियोजन आव्हान करण्यात येत आहे, रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान आहे, ते आपण दिले पाहिजे यामध्ये जास्तीत बीड विधानसभा मतदार संघातील  रक्तदात्यांनी सहभाग नोंदवावे असे  बीड राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने करण्यात आले आहे. 

तसेच  बीड विधानसभा मतदारसंघात  भव्य ऑनलाइन स्पर्धेचे आयोजन केले आहे, डान्स स्पर्धा, भाषण स्पर्धा, कीर्तन स्पर्धा, काव्यवाचन स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, निबंध स्पर्धा, फॅन्सी ड्रेस, स्पर्धा चित्रकला स्पर्धा या सर्व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे यामध्ये बीड शहरातील शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थिनी,मुली-महिला, गृहिणी साठी खास आवड असणाऱ्या सर्व साठी आयोजन केलं आहे, यामध्ये प्रत्येक स्पर्धेला स्वतंत्र बक्षीस यामध्ये प्रथम बक्षीस 1212/- रु, द्वितीय 777/- रु, रुपये तृतीय 555/-  रुपये रोख स्वरूपात व प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना देण्यात येणार आहे, ही स्पर्धा निशुल्क असून यामध्ये जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभाग नोंदवावा असे आव्हान बीड राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी   यांच्या वतीने करण्यात आले आहे.


No comments