Breaking News

जिल्ह्यात महामंडळाच्या माध्यमातून तरूणांची उद्योजक होण्याच्या दिशेने वाटचाल


बीड : अण्णासाहेब पाटील महामंडळाने दिले  1450 उद्योजकांना  64 कोटी  चे आर्थिक पाठबळ जिल्हा समन्वयक अमित मालेगावकर अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत राबविल्या जाणाऱ्या छत्रपती राजाराम महाराज उद्योजकता व कौशल्य अभियान योजनेअंतर्गत बीड जिल्ह्यात 1450 तरुणांना 63 कोटी 40 लाखाचे कर्जवाटप झाले आहे. तसेच या नवउद्योजकांना 4 कोटी 45 लाखाचा व्याज परतावा त्यांच्या खात्यावर जमा झाला आहे. नियमित हप्ता भरणाऱ्यांना महामंडळाकडून व्याज परतावा दिला जातो, अशी माहिती अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे जिल्हा समन्वयक अमित मालेगावकर यांनी दिली.

महामंडळाकडून 7684 तरुणांना पात्रता प्रमाणपत्र मिळाले आहे. शासनाने आर्थिक दुर्बल घटकातील बेरोजगार युवकांना स्वयंरोजगारासाठी महामंडळाच्या माध्यमातून शेतकरी उत्पादक  गटासाठी दहा लाखापर्यंत बिनव्याजी गट प्रकल्प कर्ज योजना आणली आहे.यासह वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना आणि गट कर्ज  व्याज परतावा योजना राबवल्या जातात. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास  महामंडळाकडून  कर्ज योजनेमार्फत उद्योग व्यवसाय उभारण्याची संधी उपलब्ध करून देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे.

अण्णासाहेब पाटील आर्थिक  मागास विकास महामंडळाच्या अर्थसहाय्यामुळे बीड जिल्हय़ात  महामंडळाच्या माध्यमातून तरुणांना  स्वप्नांना साकार करण्याचे नवे बळ मिळाले आहे.नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्यांनाही नियमित व्याज परतावा येत आहे. तरुणांनी योजनेचा लाभ घ्यावा काही अडचणी असल्यास महामंडळाच्या  जिल्हा कार्यालयाशी संपर्क करावा,असे आवाहन महामंडळाचे जिल्हा समन्वयक अमित मालेगावकर यांनी केले आहे.
No comments