Breaking News

शिवसंग्रामच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पंचशीलनगर (खोलवाट) येथील जाणीवपूर्वक रखडवलेल्या रस्ताकामाची सुरुवात

 

नगराध्यक्षांनी पंचशीलनगर रोडचे चोरुन केलेले फोटोसेशन म्हणजे "आयजीच्या जीवावर बायजी उदार" - ऍड मस्के, नंदू पिंगळे

बीड :  कित्येक दिवसांपासून नगराध्यक्ष भारतभूषण क्षीरसागर व नगरपरिषदेच्या अडमुठे धोरणामुळे रखडलेला रस्त्याचे काम शिवसंग्राम संस्थापक अध्यक्ष आ विनायकराव मेटे साहेबांच्या प्रयत्नामुळे कालपासून सुरू झाले आहे. हा रस्ता आ मेटे साहेबांनी महायुती सरकारच्या काळात मंजूर करून आणला होता. मात्र काल सकाळी श्रेयासाठी हपापलेल्या नगराध्यक्ष यांनी चार - दोन रोजचेच कार्यकर्ते जमवून फोटोसेशन करण्याचा केविलवाणा प्रयत्न करून आपलेच हसू बीडकरांपुढे करून घेतले.  प्रत्यक्षात कुंपनच शेत खात असल्याचा प्रकार या रस्त्यांबाबत झालेला आहे. 

ज्या माजी मंत्री, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष क्षीरसागरांनी या रस्त्याच्या कामासाठी निधी द्यायला हवा होता त्यांनी तो कधीच दिलेला नाही. मात्र श्रेयासाठी सातत्याने हे धडपड यांची सुरू आहे असा आरोप गेल्या कित्येक वर्षांपासून या रस्त्यासाठी संघर्ष करणाऱ्या शिवसंग्रामच्या ऍड राहुल मस्के व नंदू पिंगळे यांनी यावेळी केला. 

 

काल या ठिकाणी शिवसंग्राम पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात आली. नगरपरिषदेच्या हलगर्जीपणामूळे या ठिकाणी गेल्या कित्येक महिन्यांपासून काम रखडले होते. आ विनायकराव मेटे यांनी या रस्त्याच्या मंजुरीसाठी तसेच रस्त्याची रुंदी व लांबीबाबत विशेष बाबीअंतर्गत तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करून हा विषय मार्गी लावला होता. 

   

ऍड राहुल मस्के यांनी तर सुरुवातीला डांबरी रस्ता व नंतर सिमेंट रस्ता यासाठी 2 दशक प्रयत्न केलेले आहेत. मात्र श्रेयासाठी क्षीरसागरांनी हद्द पार ठरत आयजीच्या जीवावर बायजी उदार असल्याचे कालच्या फोटोसेशन वरून दाखवून दिले. हे रस्ताकाम सुरू करतेवेळी शिवसंग्रामचे शहर प्रभारी तथा सरचिटणीस अनिल घुमरे, सुहास पाटील, सरचिटणीस ऍड राहुल मस्के, शहर उपाध्यक्ष शेषेराव तांबे, सुनील शिंदे, दत्ता गायकवाड, नंदू पिंगळे, मनोज जाधव, विठ्ठल ढोकणे, मुज्जूभाई व शिवसंग्राम पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.


No comments