Breaking News

आझादनगर येथील मुख्यलाईन काडने संदर्भातील ८ डिसेंबर चे आत्मदहन लेखी दिलेले पत्र मागे - सलीम बापू


बाळासाहेब आडागळे । माजलगाव  

शहरातील आझादनगर येथील १०० ते १५० घरावरुन गेलेल्या मुख्य विद्युत तारांमुळे घातपात व जिवीत हानी होण्याची शक्यता असतांना व येथे अनेक वेळा शॉक अपघात होऊन देखील हि विद्युत तार काढण्यासाठी उदासीन असणाऱ्या एम.एस.ई.बी.कार्यालयाच्या निषेधार्थ दि .०८ डिसेंबर २०२० रोजी संबधीत कार्यालयासमोर आत्मदहन करू असे सय्यद सलीम बापू यांनी निवेदन दिल्याने येथील विद्युत मंडळ खडबडून जागे झाले आंदोलनाची दखल घेतल्याने ८ डिसेंम्बर रोजीचे आत्मदहन मागे घेण्यात आले  असल्याचे सय्यद सलीम बापू यांनी सांगितले.

   

उपरोक्त विषयी येथील सामाजिक कार्यसकर्ते व लोकतांत्रिक जनता दलाचे बीड जिल्हाध्यक्ष सय्यद सलीम बापू फत्तु यांनी निवेदन सादर करून खालील मागणी पूर्ण न झाल्यास आपण नागरिकांच्या ज्वलंत प्रश्नासाठी आत्मदहन करणार असल्याचे निवेदन त्यांनी दिले आहे  त्यांनी म्हंटले आहे की आपण या  मागणीसाठी अनेकवेळा आंदोलन , उपोषण , मोचें व  आंदोलन करुन देखील जनतेच्या जिवाशी खेळणाऱ्या विद्युत वितरण कार्यालयाकडून फक्त टोलवा टोलवी होत आहे .व जवळपास १०० ते १५० घरांवरुन गेलेली हि विद्युत वाहीनीची मोठी तार गेलेली असल्याने येथे नेहमी पार्कीग होते .ब तार तुटून घरावर पडते .जिल्हा परिषद नंबर १ शाळे मागच्या रोडवरच विद्युत पोल असून तो तात्काळ शाळेत हटवा अश्या आशयाचे आंदोलन सय्यद सलीम बापू यांनी दिले होते याची दखल घेऊन काल दि ५ येथील विद्युत मंडळाचे इंजिनियर यांनी आंदोलन कर्त्याला लेखी निवेदन दिल्याने येणाऱ्या  ८ डिसेंम्बर चे आत्मदहन आंदोलन मागे घेण्यात आले आसल्याचे सय्यद सलीम बापू यांनी सांगितले.

   सलीम बापू यांना लेखी पत्र देताना माजलगाव नगरीचे नगराध्यक्ष शेख मंजूर , एम एस इ बी चे अभियंता चौधरी ,आझाद नगर चे नगर सेवक भागवत भोसले , सुशांत पौळ , सामाजिक नेते नासेर खान पठाण आदी दिसत आहेत सलीम बापू यांच्या मागणीला यश आल्याने संपूर्ण आझाद नगर भागातील नागरिकांनी बापू यांचे अभिनंदन केले.


No comments