Breaking News

शेतकर्‍यांच्या न्याय हक्काच्या लढ्यात सहभागी व्हा-आ.संदिप क्षीरसागर


शेतकर्‍यांच्या आंदोलनाला पाठींबा; भारत बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन 


बीड : केंद्र सरकारने गेल्या अधिवेशनात कुठल्याही चर्चेविना बहुमताच्या जोरावर शेतकरी विरोधी तीन कायदे पारीत केले. या कायद्याबाबत विरोधी पक्षांची भूमिका केंद्र सरकारने ऐकून सुद्धा घेतली नाही. शेती संबंधीत कायद्या विरोधात देशातील शेतकरी एक होवून दिल्लीत आंदोलन करत आहे. मी देखिल शेतकरी पुत्र आहे, कृषी संस्कृतीत माझी जडणघडण झालेली आहे त्यामुळे जेथे माझा शेतकरी बांधव न्याय हक्कासाठी लढत असेल त्याला माझा पाठिंबा देणं हे शेतकरी पुत्र या नात्याने माझी जबाबदारी आहे. सर्व शेतकरी बांधवांनी उद्या होणार्‍या भारत बंदला यशस्वी करावं. बीड शहरातील व ग्रामीण भागातील शेतकर्‍यांनी, व्यापारी बांधवांनी, नागरिकांनी शांततेच्या मार्गाने सर्व व्यवहार बंद ठेवून भारत बंदमध्ये आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन आ.संदिप क्षीरसागर यांनी केले आहे.

केंद्र सरकारने गेल्या अधिवेशनात कुठल्याही चर्चेविना बहुमताच्या जोरावर शेती संबंधी तीन कायदे पारीत केले. या कायद्या विरोधात शेतकर्‍यांमध्ये प्रचंड असंतोष आहे. दिल्लीत हरियाणा, पंजाब, राजस्थानमधील शेतकरी आंदोलन करत आहेत. या आंदोलनाला देशभरातून वाढता पाठींबा मिळत आहेत. शेतकरी न्याय हक्कासाठी लढत आहेत, जय जवान जय किसानचा नारा देत अनेक संघटना चळवळीतील कार्यकर्ते या शेतकर्‍याच्या आंदोलनात सहभागी होत आहे. आ.संदिप क्षीरसागर यांनी अन्नदात्याच्या लढ्याला पाठींबा असल्याचे जाहिर करत बीड मतदार संघातील सर्व शेतकरी पुत्रांनी आजच्या या भारत बंदमध्ये सहभागी व्हावे. व्यापारी बांधवांनी आपले व्यापार बंद ठेवून सहभागी व्हावे असे आवाहन आ.संदिप क्षीरसागर यांनी केले. 

No comments