Breaking News

सत्तेत गेल्याशिवाय वंचितांचे प्रश्न सुटणार नाहीत-प्रा.शिवराज बांगर


विषमतावादी लोकांकडून संविधानाला धोका-निलेश विश्वकर्मा

बीड :  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अथक संषर्घातून या देशाला संविधान दिले आहे. त्यामुळे माणसाला माणुस म्हणून जगण्याचा अधिकार मिळाला. परंतू विषमतावादी धारेचे लोक सत्तेत आल्यापासून संविधान संपवू पाहत आहेत. त्यामुळे वंचित समाजाने सर्तक राहिलं पाहिजे. असल्याचे आवाहन वंचित आघाडीचे युवा प्रदेशाध्यक्ष निलेश विश्वकर्मा यांनी व्यक्त केले. तर सत्तेत गेल्याशिवाय वंचितांचे प्रश्न सुटणार नाहीत. त्यामुळे अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर यांचे राजकीय पारडे जड करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांवर आहे. त्यामुळे तरूणांनो कामाला लागा असे आवाहन युवा संवाद परिषदेचे आयोजक तथा वंचितचे जिल्हाध्यक्ष प्रा. शिवराज बांगर यांनी केले.

 या युवा संवाद परिषदेला वंचितचे महासचिव राजेंद्र पातोडे, बीड जिल्हा निरीक्षक अक्षय बनसोडे, आयोजक तथा वंचितचे जिल्हाध्यक्ष प्रा.शिवराज बांगर, वंचितचे जिल्हाध्यक्ष अनिल डोंगरे, वंचितचे मराठवाडा अध्यक्ष अशोक हिंगे, अरूण जाधव, रविकांत राठोड, चेतन गांगुर्डे, यांची उपस्थिती होती.

निलेश विश्वकर्मा म्हणाले की, ज्या विचार धारेच्या लोकांकडे सत्ता आहे, ती माणसे वंचितांसाठी अनुकूल नाहीत. ज्या लोकांना समता मान्य नाही. असे लोक वंचित समाजाला कधीही न्याय देवू शकणार नाहीत.याउलट हळूहळू संविधान संपवून टाकण्याचा डाव या विषमतावादी विचार धारेच्या लोकांचा आहे. त्यामुळे येणार्‍या निवडणूकांमध्ये त्यांचा पराभव करून हा डाव हाणून पाडला पाहिजे. तरच बहूजनाचे हीत आहे, अन्यथा नाही.असे आवाहन निलेश विश्वकर्मा यांनी व्यक्त केले. तर प्रा.शिवराज बांगर म्हणाले की, येणार्‍या निवडणूकांना सामोरे जाण्यासाठी युवक आघाडी स्थापन करून तरूणांची फळी निर्माण केली जात आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी आता भूमिकेतून काम केले पाहिजे.असे आवाहन प्रा.शिवराज बांगर यांनी केले. या युवा संवाद परिषदेला हजारो तरून मोठ्या संख्येने उपस्थित होते. ही युवा संवाद परिषदेचे यशस्वी करण्यासाठी संयोजक किरण वाघमारे, प्रा.राजेंद्र कोरडे, खालेद फारुकी,विश्वजित डोंगरे, सचिन मेघडंबर यांच्यासह वंचित बहूजन आघाडीच्या सर्व विंगने मोलाचे परिश्रम घेतले.

 सारिका गायकवाड यांचा वंचितमध्ये प्रवेश

अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांची राजकीय भुमिका आणि वंचित समाजाप्रती असलेली न्यायीक बाजू लक्षात घेता, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या महिला जिल्हाध्यक्षा सारिका गायकवाड यांनी वंचितमध्ये जाहीर प्रवेश केला आहे.तसेच रिपब्लिकन सेनेचे चेतन पवार यांनी देखील या युवा संवाद परिषदेत वंचितमध्ये जाहिर प्रवेश केला आहे.

No comments